जळगाव ( प्रतिनिधी ) – जुने बसस्थानकाच्या मागील गल्लीतून सायकलवर जाणाऱ्या व्यक्तीच्या हातातून ४ हजार रुपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी हिसकावून लंपास केल्याची घटना घडली आहे. जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हंसराज बिहारीलाल पांडे (वय-४५ ) हे महाजन नगर, मेहरूण येथे कुटुंबियासह वास्तव्याला आहे. ते त्यांच्या समाजातील संस्थेच्या सभेच्या पत्रिका वाटपाचे काम आटोपून ३ मार्च रोजी सायंकाळी जुने बसस्थानकाच्या मागे असलेल्या गल्लीतून सायकलने जात असताना अज्ञात ३ भामटे दुचाकीवर येऊन त्यांच्या खिशातील ४ हजार रुपये किंमतीचा मोबाईल जबरी हिसकावला. त्यांनी आरडाओरड केली. परंतु तोपर्यंत अज्ञात भामटे पसार झाले होते. त्यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. तक्रारीवरून गुरुवारी रात्री अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चंदेलकर करीत आहेत .