पुणे (वृत्तसंस्था ) -शिवसेना आणि भाजपा कार्यकर्ते यांच्या शब्दकिक चकमक उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. . शिवसैनिकांनी केलेल्या धक्काबुक्कीत भाजपा नेते किरीट सोमय्या पायरीवर पडले. . यानंतर पोलिसांनी किरीट सोमय्यांना जमावातून बाहेर काढत गाडीत बसवले. किरीट सोमय्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर ते महापालिकेमध्ये आले असताना शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी सोमय्यांवर हल्ला केला. यावेळी पोलिसांनी किरीट सोमय्यांना घटनास्थळावरून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवसैनिकांच्या धक्काबुक्कीत किरीट सोमय्या पायऱ्यांवर पडले. यानंतर पोलिसांनी सोमय्या यांना तिथून बाजूला नेत गाडीत बसवले.