• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

लॉकडाऊनमुळे प्रदूषण स्थिती सुधारण्यापाठोपाठ आता शहरातील कचरा निर्मितीही घट

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 20, 2020
in महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – लॉकडाऊनमुळे शहरातील वातावरण काहीसे नकारात्मक बनले असले, तरी यामुळे काही सकारात्मक गोष्टीही घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रदूषण स्थिती सुधारण्यापाठोपाठ आता शहरातील कचरा निर्मितीही घटली आहे. महापालिकेच्या नोंदीनुसार शहरातील कचरानिर्मिती ही सुमारे 1500 मेट्रिक टनने घटली असून प्रामुख्याने हॉटेल व्यवसाय बंद असल्याने हा बदल झाला असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे शहरातील खाद्यव्यवसाय बंद असल्याने त्यामध्ये उपयोग केल्या जाणाऱ्या भाज्यांचा वापर कमी झाला आहे. तर विविध प्रकारच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार, विविध समारंभ यासारख्या गोष्टी बंद असल्याने प्लॅस्टिक, सजावटीच्या वस्तू तसेच अन्य वस्तू ज्यामुळे सुका कचरानिर्मिती होते, त्यांचा वापरही घटला आहे. त्यामुळेच ज्याठिकाणी सर्वसामान्यपणे 2100 मेट्रिक टन प्रतिदिन इतकी कचरा निर्मिती होत होती, ती सध्या 500 ते 600 मेट्रिक टन प्रतिदिन इतकी कमी झाली आहे. म्हणजेच सुमारे 1500 मेट्रिक टनची घट झाली आहे. याबाबत महापालिकेच्या घनकचरा विभागाचे प्रमुख ज्ञानेश्‍वर मोळक म्हणाले, ‘शहरातील कचरानिर्मितीचे प्रमाण लक्षणीयरित्या घटले आहे. यामध्ये हॉटेल्स व्यवसाय बंद असल्याने सर्वाधिक परिणाम झाला आहे. तसेच, रहिवासी भागातून निर्माण होणाऱ्या कचरा हा त्या त्या सोसायटीतच जिरवला जाईल यासाठी महापालिका प्रयत्न करत असून त्यासाठी विशेष सवलत देण्याचेही आमचे प्रयत्न सुरू आहेत. लॉकडाऊन काळात एकीकडे घरोघरी जाऊन कचरा वेचणाऱ्या स्वच्छता कर्मचारी, कचरावेचक यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र, दुसरीकडे केलेल्या कचऱ्याचे करायचे काय? त्या कचऱ्यापासून मिळणारे उत्पन्न बंद झाल्याने शहरातील शेकडो कचरा वेचकांसमोर रोजगाराचा गंभीर प्रश्‍न उपस्थित झाला असल्याचे ‘स्वच्छ’ या स्वच्छताविषयक काम करणाऱ्या संस्थेच्या आऊटरीच अधिकारी सूचिमिता पै यांनी सांगितले. लॉकडाऊनमुळे पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील कचरानिर्मिती निम्म्यावर आली आहे. बोर्डाच्या आठ वार्डांमधून सामान्यपणे प्रतिदिवस पन्नास टन इतकी कचरानिर्मिती होते, मात्र सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे हे प्रमाण 25 ते 30 टन इतके झाल्याची नोंद बोर्डाच्या आरोग्य विभागाकडून नोंदवली आहे. लष्कर परिसरात असणाऱ्या एम.जी. रोड त्या पाठोपाठ छत्रपती शिवाजी मार्केट, सेंट्रल स्ट्रीट या भागांत हॉटेल्स आणि भाजी मार्केट असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर कचरा साठत होता. मात्र, सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे या भागातील सर्व हॉटेल्स भाजीपाला मार्केट बंद केली आहेत. यामुळे कचऱ्याचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे.


 

 

Previous Post

खूबचंद साहित्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणात नगरसेवकाला अटक

Next Post

जळगावात अवैध दारू विक्री करणारा ताब्यात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगावात अवैध दारू विक्री करणारा ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !
1xbet russia

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

February 28, 2026
Auto Draft
1xbet russia

किरकोळ वादातून तरुणाची हत्या, ३ जण गंभीर

February 28, 2026
शिरसोलीत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा
1xbet russia

शिरसोलीत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

February 28, 2026
धुळे येथे विभागीय कराटे, तायक्वांदो व वुशू स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दबदबा
1xbet russia

धुळे येथे विभागीय कराटे, तायक्वांदो व वुशू स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दबदबा

February 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

February 28, 2026
Auto Draft

किरकोळ वादातून तरुणाची हत्या, ३ जण गंभीर

February 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon