एरंडोल (प्रतिनिधी) – तालुक्यातील आडगाव या ठिकाणी हुतात्मा स्मारक व ग्रामपंचायत कार्यालया मध्ये १८ ऑगस्ट रोजी हुतात्मा दिन निमित्त झेंडावंदनाचा कार्यक्रम पार पडला . यावेळी ग्रामपंचायत मध्ये स्वातंत्र्य सैनिकांचे वारसदार साहेबराव महादु पाटील यांच्याहस्ते झेंडावंदन करण्यात आले तर हुतात्मा स्मारक मध्ये महारू दशरथ महाजन यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले .या कार्यक्रमात एरंडोल नायब तहसिलदार एस पी शिरसाठ यांची प्रमुख उपस्थित होती.


यावेळी ग्रामपंचायत च्या वतीने कोरोंना काळात कार्य केलेले सामाजिक कार्यकर्ते शिक्षक अंगणवाडी सेविका ,आशा सेविका ,आरोग्य सेविका आदिना कोरोंना योद्धा म्हणून सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच एस. एस. सी. बोर्डात प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाने यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह व आकर्षक पेन देऊन सत्कार करण्यात आला . हुतात्मा स्मारक येथे वृक्षरोपण करण्यात आले .या कार्यक्रमा प्रसंगी गावातील समाज सेवक नामदेव कौतिक पाटील यांनी अंगांवडीस पाण्याच्या दोन टाक्या भेट दिल्या यावेळी मानवंदना देण्यासाठी गावातील सरपंच सुनील भिल्ल , उपसरपंच दिलीप पवार ,ग्रामसेवक, तलाठी , ग्रामपंचायत सदस्य ,आशा सेविका ,मुख्याध्यापक, यांच्यासहगावातील हुतात्मा व स्वतंत्रसैनिकांचे वारसदार, तसेच गावातील नागरिक उपस्थित होते .या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रल्हाद पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे शेवटी उपसरपंच दिलीप पवार यांनी आभार मानले







