• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

पंकजा मुंडेच्या मुद्यावर आता देवेंद्र फडणवीस म्हणतात…

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 15, 2021
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी मुंबतील कार्यालयात शक्तीप्रदर्शन केलं. केंद्रीय मंत्रिमंडळातून प्रीतम मुंडे यांना डावलल्यानंतर बीड जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. त्या नाराज पदाधिकाऱ्यांची समजुत काढण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत बोलताना पंकजा यांनी ‘माझे नेते नरेंद्र मोदी आणि अमित शहा’ असल्याचे म्हटले होते. त्यावेळी त्यांनी राज्यातील नेत्यांची नावं घेणं टाळलं होतं. त्यावर आता विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपा खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारुन डावलल्यानंतर पदाधिकाऱ्यांचं राजीनामा सत्र सुरू झालं होतं. त्या नाराज पदाधिकाऱ्यांची समजुत काढण्यासाठी पंकजा यांनी मुंबईतील कार्यालयात बैठक बोलावली होती. त्यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी, अमित शाह आणि जेपी नड्डा यांची नावं घेतली. पण, राज्यातील नेत्यांची नावं घेणं टाळलं. यानंतर पत्रकार परिषदेत याबाबत त्यांना प्रश्न विचारला असता, ‘मी राष्ट्रीय पातळीवर काम करते. माझे नेते नरेंद्र मोदी आणि अमित शाह आहेत’, असं म्हणत राज्यातील नेत्यांना डावललं. विशेषतः देवेंद्र फडणवीसांवर अप्रत्यक्ष निशाणा साधल्याची चर्चा सुरू झाली. आता पंकजा मुंडे यांच्या याच भाषणावर देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना पंकजा मुंडेंच्या भाषणाबाबत प्रश्न विचारण्यात आला. दोन दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी भाषण केले, तुम्ही ते भाषण ऐकलं का? असा प्रश्न पत्रकारांनी देवेंद्र फडणवीसांना विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना, पंकजां मुंडेचं भाषण ऐकण्याचा प्रश्नच नाही, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली. तसेच, आमचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडेंच्या भाषणावर खुलासा केला आहे. त्यांच्या अनेक मुद्द्यांवर त्यांनी सविस्तर खुलासेही केलेत. त्यावर आता मी बोलण्यात काही अर्थ नाही, असं म्हणत विषयाला पूर्णविराम देण्याचा फडणवीसांनी प्रयत्न केला.

मुंबईतील कार्यालयात पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की, धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न तोवर करणार जोवर शक्य आहे. माझे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह व जे पी नड्डा आहेत आणि त्यांच्यावर मला पूर्ण विश्वास आहे. पाच पांडव का जिंकले कारण त्यांच्याकडे संयम होता. जो चांगला असतो तो युद्ध टाळण्याचा प्रयत्न करतो. मी धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न तोवर करते जोवर शक्य आहे. मी कुणालाही भीत नाही, निर्भय राजकारणाचे माझ्यावर संस्कार आहेत. मी माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्यांचा कधीही अनादर केला नाही. मी निर्भय आहे ते तुमच्याच जीवावर. एक व्यक्ती स्वतःचा विचार करून काहीही मिळवू शकतो. मला माझ्यासाठी काही नको, तुमच्यासाठी हवे आहे. हे धर्मयुद्ध टळण्यासाठी माझे ऐका, आपण कष्टाने बनवलेले घर का सोडायचे. ज्या दिवशी छत अंगावर पडेल त्यादिवशी बघू, असेही यावेळी पंकजा म्हणाल्या.

पंकजा म्हणाल्या, माझा नेता मोदी. माझा नेता अमित शाह. आणि माझा नेता जे.पी. नड्डा हे आहेत. त्यांच्या मनात माझ्याबद्दल चांगले विचार आहेत, असा मला विश्वास आहे. आपण कष्टाला घाबरत नाही. कोयता घेऊन कामाला जाऊ. आपल्याला काय, मला माझ्यासाठी काही नको. मला प्रीतमसाठी काही नकोय. मला भाजपने अर्ज भरायला लावला होता. पण, ते मला म्हणाले तुम्हाला देणे शक्य नाही. मी म्हणाले धन्यवाद. नंतर रमेश कराडांचे नाव आले, काय बिघडले? मी कोण आहे.? तुम्ही तर प्रोटोकॉलने माझ्यापेक्षा मोठे आहात. मी तुमच्यापेक्षा छोटी आहे, मला सजवण्याचा प्रयत्न करू नका, असेही पंकजा यावेळी म्हणाल्या.


 

Previous Post

जळगाव जिल्ह्यात फक्त पाच रुग्ण कोरोना बाधित आढळले

Next Post

रावेरला लाचखोर लिपिक गजाआड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

रावेरला लाचखोर लिपिक गजाआड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव जाणाऱ्या एसटीची डंपरला मागून धडक, बसचालकासह प्रवासी जखमी
1xbet russia

भरधाव जाणाऱ्या एसटीची डंपरला मागून धडक, बसचालकासह प्रवासी जखमी

July 4, 2025
थरार, तरुणावर सिनेस्टाईल गोळीबार करून केली निर्घृण हत्या !
1xbet russia

थरार, तरुणावर सिनेस्टाईल गोळीबार करून केली निर्घृण हत्या !

July 4, 2025
भरधाव दुचाकी पलटली, वाहनाचे २ तुकडे : तरुणाचा जागीच मृत्यू, २ गंभीर
1xbet russia

भरधाव दुचाकी पलटली, वाहनाचे २ तुकडे : तरुणाचा जागीच मृत्यू, २ गंभीर

July 4, 2025
फिजिओथेरपी शिक्षण अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीवर २ दिवसांची कार्यशाळा
1xbet russia

संघर्षातून संधीकडे गोदावरी नर्सिंगमध्ये प्रबोधन सत्र

July 4, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव जाणाऱ्या एसटीची डंपरला मागून धडक, बसचालकासह प्रवासी जखमी

भरधाव जाणाऱ्या एसटीची डंपरला मागून धडक, बसचालकासह प्रवासी जखमी

July 4, 2025
थरार, तरुणावर सिनेस्टाईल गोळीबार करून केली निर्घृण हत्या !

थरार, तरुणावर सिनेस्टाईल गोळीबार करून केली निर्घृण हत्या !

July 4, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon