जळगाव (प्रतिनिधी) – आज जिल्ह्यात फक्त ५ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे . या ५ पैकी एकट्या चाळीसगाव तालुक्यातच ४ आणि भुसावळ तालुक्यात पाचवा रुग्ण सापडला आहे
जळगाव शहर- ०, जळगाव ग्रामीण-०, भुसावळ- १, अमळनेर-०, चोपडा-०, पाचोरा-०, भडगाव -०, धरणगाव -०, यावल- ०, एरंडोल -०, जामनेर- ०, रावेर – ०, पारोळा -०, चाळीसगाव- ४, मुक्ताईनगर-०, बोदवड -०, इतर जिल्हे ० असे एकुण ५ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहे.
जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार आजपर्यंत एकुण १ लाख ४२ हजार ४८० बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ३९ हजार ७१७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर १८९ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज शहरासह १३ तालुके निरंक आढळून आले आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविली आहे.