• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

केळी पिकावरील कुकुंबर मोसॅक व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 14, 2021
in जळगाव
0

जळगाव, (प्रतिनिधी) – जिल्ह्यात केळी हे प्रमुख फळपिक असून सुमारे 45 हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड केली जाते. कुकुंबर मोसॅक व्हायरस (CVM) हा केळी पिकावरील प्रमुख विषाणुजन्य रोग आहे. दरवर्षी माहे जुलै ते सप्टेंबर दरम्यान CVM रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळुन येतो. CVM रोगाचा प्रादुर्भाव रोखणे व नियंत्रण करण्यासाठी शेतक-यांनी पुढील काळजी घेण्याचे आवाहन कृषि विभागाने केले आहे.
सततचे ढगाळ वातावरण, जुन-जुलै महिन्यात वारंवार पडणारा अखंडित पाऊस, प्रकाशाची तीव्रता कमी असणे व किमान तापमान 24-25 अंश से. असणे, जास्त आर्द्र हवामान, इत्यादी घटक CVM रोगास पोषक असतात. सुरुवातीस कोवळया पानांवर विरहित, पिवळसर पट्टे दिसणे, पानाचा पृष्ठभाग आकसला जाऊन व कडा वाकडया होऊन पानांचा आकार लहान होणे, पानाच्या शिरा ताठर होऊन संपूर्ण पान कडक होणे, पानांच्या शिरांमधील भाग काळपट पडून पाने फाटणे, पोंग्याजवळील पान पिवळे पडून पोंगा सडणे, झाडांची वाढ खुंटणे, इत्यादी लक्षणे CVM रोगात आढळतात.
CVM विषाणुचा प्राथमिक प्रादुर्भाव रोगट कंदापासून होतो तसेच या रोगाचा दुय्यम प्रसार प्रामुख्याने मावा किडीच्या माध्यमातुन होतो. CVM विषाणुची जवळ-जवळ 1 हजार यजमान पिके येतात. CVM रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्याच्या नियंत्रणासाठी कोणतेही ठोस उपाय करता येत नाही. तथापी CVM रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. प्रादुर्भावग्रस्त झाडे मुळासकट उपटुन दुर ठिकाणी जाळुन किंवा गाडुन टाकावी. बागेची 2/3 वेळा चार ते पाच दिवसांनी नियमित निरिक्षण करुन रोगग्रस्त झाडे आढळल्यास त्यांचीही विल्हेवाट लावावी. बागेतील व बांधावरील मोठा केणा, छोटा केणा, धोतरा, काहे, रिंगणी, चिलघोल, शेंदाळे, गाजर गवत इत्यादी प्रकारची तणे काढुन बाग स्वच्छ ठेवावी, पिकाची फेरपालट करावी.
केळीत काकडी, भोपळा, कारली, दुधीभोपळा, गिलके, चवळी, टोमॅटो, वांगे, मिरची, मका या पिकाची लागवड करु नये, तसेच केळी बागेभोवती रान कारली, शेंदळी, कटुर्ले, गुळवेल यासारख्या रानटी झाडांचे वेल नष्ट करावेत. मावा या वाहक किडीच्या बंदोबस्तासाठी डायमेथेएट 30 ई.सी. 20 मिली किंवा थायोमिथोक्झाम 25 डब्लु जी. 2 ग्राम किंवा इमिडाक्लोप्रीड 17.8 एस.एल. 5 मिली या किटकनाशकांची 10 लिटर पाण्यामध्ये मिसळुन फवारणी करावी, असे आवाहन संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.


 

 

Previous Post

आयकर विभागात खेळाडूंसाठी भरती

Next Post

सावधान तुमचीही होऊ शकते फसवणूक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सावधान तुमचीही होऊ शकते फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळ, रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला दोघ तरुणांनी गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..!
1xbet russia

खळबळ, रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला दोघ तरुणांनी गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..!

August 27, 2026
हृदयविकार तज्ज्ञांकडून अत्याधुनिक उपचार; योजनेअंतर्गत सवलतीचा रुग्णाला लाभ
1xbet russia

हृदयविकार तज्ज्ञांकडून अत्याधुनिक उपचार; योजनेअंतर्गत सवलतीचा रुग्णाला लाभ

August 27, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

निंभोरा येथे जुन्या भांडणातून दोघांना मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

August 27, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

भडगावात विद्युत उपकेंद्राला चोरट्यांचा डल्ला; ४ लाख ६० हजारांचा ऐवज लंपास

August 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खळबळ, रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला दोघ तरुणांनी गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..!

खळबळ, रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला दोघ तरुणांनी गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..!

August 27, 2026
हृदयविकार तज्ज्ञांकडून अत्याधुनिक उपचार; योजनेअंतर्गत सवलतीचा रुग्णाला लाभ

हृदयविकार तज्ज्ञांकडून अत्याधुनिक उपचार; योजनेअंतर्गत सवलतीचा रुग्णाला लाभ

August 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon