जळगावच्या तरूणाची 64 हजारांची फसवणूक, गाझीयाबाद येथून आरोपी अटकेत
जळगाव (प्रतिनिधी) – जळगावच्या विद्युत नगरातील तरूणाची एचडीएफसी बँकेत फसवणूक केल्याच्या प्रकरणात जळगाव पोलिसांनी उत्तरप्रदेश गाझियाबाद येथून आरोपीला अटक केली आहे.त्यांना जळगावात आणून तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मंजित प्रल्हाद जांगड यांना फेब्रवारी ते मार्च महिन्यादरम्यान भावना, विकास जैन, अनन्या गुप्ता, स्वाती शर्मा यांच्या नावाने बनावट कॉल करून त्यांना बँकेचे बनावट कागद पाठवून, त्यांना नोकरीचे आमिष देऊन त्यांच्या बँक खात्यातून 64 हजार 574 रुपये काढून घेतले व त्यांची फसवणू केली होती. या प्रकरणाचा जळगाव पोलिसांनी अभ्यास केल्यानंतर अभय शिवाजी तिवारी , वचन बालमुकुंद शर्मा यांनी हा प्रकार केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी तपासचक्रे फिरवून गाझीयाबाद उत्तरप्रदेश येथून दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांना जळगावात आणून न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.