• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जीएमसीमध्ये मिळाले अत्यवस्थ नवजात शिशुला जीवदान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 21, 2021
in आरोग्य, जळगाव, महाराष्ट्र
0

अधिष्ठात्यांच्या उपस्थितीत १६ दिवसानंतर बाळाला डिस्चार्ज

जळगाव : – कमी दिवसाचे आणि कमी वजनाच्या गंभीर नवजात बालकाला १६ दिवसांच्या यशस्वी उपचारानंतर सोमवार, २१ जून रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. अत्यंत गंभीर प्रकृती असलेल्या या रुग्णावर योग्य औषध उपचाराने मृत्यूच्या दाढेतून वाचविता आले. या शिशुस अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या प्रमुख उपस्थितीत रुग्णालयातून निरोप देण्यात आला.

यावल तालुक्यातील दुसखेडे येथील एका महिलेची येथील शाहू महाराज हॉस्पिटल मध्ये प्रसूती झाली होती. शिशूचे वडील जळगाव मेरिको कंपनीत कर्मचारी आहेत. बाळाच्या जन्मानंतर आईला कोरोना सदृश लक्षणे जाणवू लागल्याने त्या नवजात बालकाला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ५ जून रोजी दाखल करण्यात आले. बाळास श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यास सुमारे १२ दिवस व्हेंटिलेटरद्वारे कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्यात आला. तसेच फुफ्फुसे नैसर्गिकरित्या काम करीत नसल्याने त्यांना योग्य औषधांनी नियंत्रित करण्यात आले. त्यामुळे बाळाची प्रकृती बरी होऊन ते सामान्य बाळासारखे हालचाल करायला लागले. महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून या बालकावर मोफत उपचार करण्यात आले. यासाठी रुग्णालयातील योजनेच्या संपर्क कार्यालयाने कागदपत्रांची पूर्तता केली.

सोमवारी २१ जून रोजी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या प्रमुख उपस्थितीत रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे आदी उपस्थित होते. येथील बालरोग व चिकित्सा विभागामध्ये नुकतेच नवीन दहा लहान बालकांसाठीचे अतिशय अद्ययावत वेंटिलेटर प्राप्त झाले आहेत. त्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अनावरण झाले होते. या नव्या अद्ययावत व्हेंटिलेटरचा लाभ घेऊन बरे होणारे हे पहिलेच नवजात शिशु आहे.

अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रशांत देवरे, बालरोग व चिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. बाळासाहेब सुरोशे यांच्या मार्गदर्शनाखाली नवजात शिशु व अतिदक्षता विभागाचे इन्चार्ज डॉ. वृषाली सरोदे, डॉ.शैलजा चव्हाण, डॉ. हितेंद्र भोळे, डॉ. अविनाश खिलवाडे यांनी शिशुवर उपचार केले. उपचारासाठी वार्डातील इन्चार्ज अधीसेविका शिल्पा पाटील, स्टाफ नर्स किशोरी कावडे, मंगला माळी, सिमा माळी, रुपाली झोपे यांनी परिश्रम घेतले.


 

 

Previous Post

जागतिक योगदिनी देशात विक्रमी ७० लाख लसीकरण

Next Post

तापी नदीच्या पुरात शेतकऱ्यांचा बुडून मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

तापी नदीच्या पुरात शेतकऱ्यांचा बुडून मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतातील शेड फोडून १९ डुकरांची चोरी; ८४ हजारांचा फटका
1xbet russia

शेतातील शेड फोडून १९ डुकरांची चोरी; ८४ हजारांचा फटका

July 28, 2026
धडक कारवाई! जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू चोरीवर पोलिसांचा मोठा प्रहार
1xbet russia

धडक कारवाई! जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू चोरीवर पोलिसांचा मोठा प्रहार

July 28, 2026
डॉक्टरांकडे घरफोडी, ६२ हजारांचा ऐवज लांबविला
1xbet russia

मालकनगरात घरफोडी; सोन्याचे दागिने व तीन मोबाईलसह ७० हजारांचा ऐवज लंपास

July 28, 2026
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली
1xbet russia

भुसावळात घरात घुसून पिस्तुलाचा धाक दाखवत दरोडा; सात जणांविरुद्ध गुन्हा

July 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतातील शेड फोडून १९ डुकरांची चोरी; ८४ हजारांचा फटका

शेतातील शेड फोडून १९ डुकरांची चोरी; ८४ हजारांचा फटका

July 28, 2026
धडक कारवाई! जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू चोरीवर पोलिसांचा मोठा प्रहार

धडक कारवाई! जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू चोरीवर पोलिसांचा मोठा प्रहार

July 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon