जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील निमखेडी येथील एलआयसी एजंटाची घरसमोरून २५ हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हरीभाऊ राजाराम चंदरकार (वय ४५) रा. न्यू अण्णा ता. संग्रामपूर जि. बुलढाणा ह.मु. निमखेडी ता.जि.जळगाव हे एलआयसी एजंटचे काम करतात. (एमएच १९ डीएच ४८३७) क्रमांकाच्या दुचाकीवरून आपल्या एलआसीचा व्यवसाय करतात. २ मार्च रोजी दुपारी ३ वाजता घरासमोर दुचाकी पार्किंग करून लावली होती. परिसरात शोधाशोध केली असता दुचाकी मिळून आली नाही. मंगळवारी रात्री उशीरापर्यंत हरीभाऊ चंदरकार यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.







