भुसावळ (प्रतिनिधी)येथील प्रभात कॉलनीमधील एका बंद घरातून अज्ञात चोरटयांनी १ लाख १० हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली असून शहरात घरफोड्यांचे सत्र सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातवरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शहरचे पो. नि. निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी भेट देवून पाहणी केली.

प्रशांत भरतराव बेहेेरे हे प्रभात कॉलनी परीसरातील प्रमोद पाटील यांच्या घरात कुटुंबासह राहतात. बेहरे हे कामानिमित्त कुटुंबासह नाशिक येथे गेले असल्याची संधी चोरट्यांनी साधली. घराचा दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी बेडरूममध्ये असलेल्या कपाटातून ५५ हजारांची रोकड, दोन तोळे वजनाचे व ५५ हजार रुपये किंमतीचे दागिने, ५ हजार रुपयांचे सहा भार चांदीचे दागिने, लांबवीले आहे. दि. ९ ते १० जानेवारी दरम्यान ही घरफोडी झाल्याचा अंदाज आहे. तपास सह. निरीक्षक विनोदकुमार गोसावी करीत आहेत.







