जळगाव;– देवगाव येथे एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये असलेली ३५ हजार रुपये किमतीची ट्रॅक्टरची ट्रॉली अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, आत्माराम रघुनाथ सोनवणे (वय-३६) रा. देवगाव ता.जि. जळगाव हे शेतीचे काम करून उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे ट्रक्टरची ३५ हजार रूपये किंमतीची ट्रॉली (एमएच १९ एएन ७३१३) आहे. शेतीसाठी या ट्रॉलीचा वापर करतात. देवगाव फाट्याजवळील शेत गट क्रमांक १२३ च्या गोडावून मध्ये ही ट्रॉली ठेवण्यात आली होती. १० जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता ट्रॉली जागेवर होते. दुसऱ्या दिवशी ११ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता ट्रॉली जागेवर दिसून आली नाही. ट्रॉली कोणी नेली असेल म्हणून गावात विचारपूस केली असता कोणीच नेली नसल्याचे स्पष्ट झाले. आत्माराम सोनवणे यांनी रात्री उशीरा तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली. अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संदीप पाटील करीत आहे.







