जळगाव ;-तांबापुर भागातील बिलाल चौक भागात राहणाऱ्या एका घरातून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून २५ हजारांची रोकड लंपास केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , तांबापूरा भागात मोहसीन शेख सलीम (वय-२४) रा. बिस्मील्ला चौक, तांबापूरा हे आपल्या कुटुंबियासह राहतात. त्यांचे दुमजली इमारत आहे. १० जानेवारी रोजी रात्री १० वाजता घरातील कुटुंबिय जेवण करून खालच्या घरात झोपले. अज्ञात चोरट्यांनी वरच्या घरात शिरून घरात ठेवलेले २५ हजार रूपयांची रोकड आणि हॅन्ड बॅग, केबलचे बुक चोरून नेल्याचे ११ जानेवारी रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास उघडकीला आले. याप्रकरणी सोमवारी रात्री उशीरा पर्यंत पोलीसात नोंद नव्हती. मोहसीन शेख सलीम यांच्या फिर्यादीवरून ११ जानेवारी रोजी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक ईम्रान सैय्यद करीत आहे








