जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव तालुक्यातील चिंचोली गावात सर्रास ब्लॅकने दारुची विक्री होत असल्याची गुप्त माहिती पेलिसांना मिळाली होती. पोलिस पथकाने माहितीचा पाठपुरावा करुन दोन संशयीतांना मुद्देमालासह अटक केली असून एमआयडीसी पोलीसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

सहाय्यक पेलिस निरीक्षक अमोल मोरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, जळगाव औरंगबाद रोडवरील चिंचोली गावाजवळ हॉटेल सागरच्या मागील बाजुस एक व्यक्ती देशी विदेशी दारुच्या बॉटल विक्री करत असल्याच्या माहितीचा पाठपुरावा करत उपनिरीक्षक विशाल सोनवणे, सचिन मुंडे, सिद्धेश्वर डापकर, साईनाथ मुंडे अशांचे पथक चिंचोली गावात धडकले. हॉटेल सागरच्या मागील बाजुस अडोश्याला एक व्यक्ती खोक्यातून दारुच्या बाटल्या विकत असल्याचे आढळून आले. त्याला ताब्यात घेतल्यावर त्याचे नाव मनोज सुरेश वंजारी (वय-२४,रा.जगवानी नगर एमआयडीसी) सांगीतले. त्याच्या ताब्यातून ३ हजार ६१२ रुपये किंमतीच्या विवीध ब्रॅण्डच्या ४८ दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असून पेलिस नाईक सिद्धेश्वर डापकर यांच्या तक्रारीवरुन गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.







