जळगाव (प्रतिनिधी) – दर्जेदार चहा उत्पादनांसाठी सुप्रसिद्ध नवरंग चहा हे गुणवत्तापूर्ण व नाविन्यपूर्ण ठरले असून आता नवरंग चहाचा किफायती छोटा पॅकला ग्राहकांची पसंती लाभत असून या उत्पादनाची मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली आहे.
खान्देशातील घरा-घरापासून तर शहरांपर्यंत १९७२ पासून दररोजची सकाळ चहाच्या आनंदाने सुरूवात करण्याची परंपरा नवरंगने जोपासली आहे. सेवातत्वाची समर्पित भावना, प्रगती पथावर असलेले उत्तम व कायमस्वरूपी दिर्घकाळापासुन कार्यरत चहाचे नावाजलेले ब्रॅण्ड ‘नवरंग चहा’ असून आता नावीन्यपूर्ण ‘किफायती छोटा पॅक’ चहाचे हे उत्पादन खान्देशच्या कानाकोपर्यात आपल्या अप्रतिम व लाजवाब चवीचा चहाची स्फूर्ती मिळवून देणार आहे. त्यातच आता किफायती छोटा पॅकच्या रूपाने ५० रूपयात स्पेशल डिमांड पॅक १२५ ग्रॅम मध्ये उपलब्ध करून दिला असून तो ग्राहकाच्या पसंतीत उतरलेला असून त्याची मागणी वाढली आहे. हा पॅक प्रत्येक घरापर्यंत, गृहिणींपर्यंत जावा व ग्राहकांना हव्या त्या पॅकिंगमध्ये चहा मिळावा हाच यामागील उद्देश आहे. यात रू.२, रू.५, रू.१०, रू.२०, रू.४० व ५० रूपयाच्या किंमतीत खरेदीस ग्राहकांच्या आवडीसाठी उपलब्ध करून दिला आहे. हा चहा खान्देशातील प्रमुख विक्रेत्यांकडे प्रत्येक किराणा दुकानात उपलब्ध करून दिला आहे.
आज किफायती परवडणार्या छोट्या पॅकसाठी म्हणजे स्पेशल डिमांड पॅकची मागणी लक्षात घेता नव नव्या प्रकारचा पॅक हे सदैव ग्राहकांच्या आवडीत देत राहण्याचा मानस संचालकांनी केला आहे.