जिल्हा कार्यवाहपदी संदीप घुगे, जिल्हाध्यक्ष शालीकराम पवार, महानगरध्यक्ष अनिल जोशी

जळगाव (प्रतिनिधी) – येथे झालेल्या बैठकीत जळगांव जिल्हा पदाधिकारी नियुक्ती करण्यात आली.
यात जिल्हा कार्यवाह म्हणून संदीप घुगे, जिल्हा अध्यक्षपदी शालीकराम पवार,महानगर अध्यक्षपदी अनिल जोशी यांची निवड करण्यात आली.
सदर बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष कर्मवीर दादा इदाते, राष्ट्रीय कार्यवाह अनिल फड, राज्य कार्यवाह राजेंद्र भोसले आदी उपस्थीत होते. बैठकीला भटके विमुक्त यांचा सर्वांगीण विकास व्हावा. तसेच त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारच्या योजना परीषदेच्या माध्यमातुन शेवटच्या घटकापर्यंत पोहचवणे अशा अनेक विषयावर चर्चा झाली.
सदर पदाधिकारी यांनी भटके विमुक्तावर सरकारच्या योजना गावपातळीपर्यंत पाहेचविण्याचा मनोदय व्यक्त केला. निवड झाल्याबद्दल कर्मविर दादा इदाते, अनिल फड, दिलीप धोत्रे, राजेंद्र भोसले, जगदीश चित्रकथी, नरेश बागडे, भानुदास जोशी, किशोर सानप, भुषण लाडवंजारी, शंकर दिघोळे, कडु धनगर, निर्मलाताई शिंदे, नरसिंग पवार यांनी अभिनंदन केले.







