• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात आंतरविभागीय तलवारबाजी स्पर्धा उत्साहात संपन्न!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 4, 2026
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात आंतरविभागीय तलवारबाजी स्पर्धा उत्साहात संपन्न!

गोदावरीच्या खेळाडूंची सुवर्णपदकांची चमक; जम्मू-काश्मीर येथे होणार्‍या अखिल भारतीय स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड

जळगाव : गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे यांच्या सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील आंतरविभागीय तलवारबाजी स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या स्पर्धेत विद्यापीठांतर्गत विविध महाविद्यालयांमधील सुमारे ३० पुरुष व २५ महिला खेळाडूंनी सहभाग घेतला. गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या खेळाडूंनी विविध प्रकारांत उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्ण, रौप्य व कांस्यपदकांची कमाई केली.

पुरुष व महिला अशा दोन्ही गटांत सेबर, एपी आणि फॉइल या तीन प्रकारांत चुरशीचे सामने रंगले. उद्घाटनप्रसंगी इ अँड टे विभागप्रमुख डॉ. हेमंत इंगळे, डॉ. तुषार कोळी (अधिष्ठाता), प्रा. मुकुंद शिरसाठ, प्रा. मनोज राठोड आणि एनआयएस फेन्सिंग प्रशिक्षक पायल मोरकर विविध विभागांचे प्रमुख तसेच प्राध्यापकवर्ग उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला.

यावेळी डॉ. हेमंत इंगळे यांनी खेळातून केवळ पदके किंवा विजय मिळत नाही, तर व्यक्तिमत्त्वाचा विकास होऊन जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता निर्माण होते, असे त्यांनी सांगितले. स्पर्धेतील पदकविजेत्यांचा निकाल पुढीलप्रमाणे : सेबर पुरुष गटात गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तेजस पाटील सुवर्णपदक महिला गटात सायली पाटील सुवर्णपदक, साक्षी उबाळे कांस्यपदक मिळविले.

एपी पुरुष गटात सिद्धांत विधाते (डॉ. व्ही. के. पाटील सीओईटी, छत्रपती संभाजीनगर) सुवर्णपदक, तर गोदावरीच्या मयूर कोळी रौप्यपदक पटकावले. एपी महिला गटात गोदावरीच्या वैष्णवी साबळे रौप्यपदक मिळविले. फॉइल पुरुष गटात सिद्धार्थ विधाते सुवर्णपदक, तर गोदावरीच्या तुषार पाटील कांस्यपदक पटकावले. फॉइल महिला गटात गोदावरीच्या सोनम गुंजाळ सुवर्णपदक, तर निसर्गा पाटील कांस्यपदक मिळवून महाविद्यालयाच्या यशात भर घातली.

अखिल भारतीय स्पर्धेसाठी खेळाडूंची निवडया स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे विद्यापीठाच्या संघासाठी विविध खेळाडूंची निवड करण्यात आली. पुरुष राखीव गटात एपीसाठी शिवराज भोसले (एमजीएम, नांदेड), फॉइलसाठी अंकुश सामुद्रे (डी. एन. पटेल, शहादा) आणि सेबरसाठी दत्ता कपाटे (एमजीएम, नांदेड) यांची निवड झाली. महिला राखीव गटात एपीसाठी विशाखा सुरवाडे (गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय), फॉइलसाठी रोशनी सूर्यवंशी आणि सेबरसाठी कृपा सूर्यवंशी (डी. एन. पटेल, शहादा) यांची निवड करण्यात आली. निवड झालेले पदकविजेते खेळाडू जम्मू-काश्मीर येथे आयोजित होणार्‍या अखिल भारतीय तलवारबाजी स्पर्धेत विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.स्पर्धेचा समारोप पारितोषिक वितरण समारंभाने झाला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

क्रीडा संचालक डॉ. जयंत जाधव आणि प्रा. नकुल गाडगे यांनी स्पर्धेच्या नियोजनात व आयोजनात महत्त्वपूर्ण योगदान दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी राजश्री यादव हिने केले.या यशाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील आणि डॉ. अनिकेत पाटील यांनी सर्व पदकविजेत्या व सहभागी खेळाडूंचे अभिनंदन केले. तसेच अखिल भारतीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

जळगाव जिल्ह्यातील उद्योगांना विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने

Next Post

जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुलींचे सुवर्णयश!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात आंतरविभागीय तलवारबाजी स्पर्धा उत्साहात संपन्न!

जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुलींचे सुवर्णयश!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा
क्राईम

अमळनेरमध्ये घरासमोरून ४५ हजारांची मोटारसायकल चोरी

November 4, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
क्राईम

शेतातील शेडमधून कपाशी आणि बॅटरी चोरीला

November 4, 2026
भुसावळात हुडको कॉलनीत बंद घर फोडून पावणेदोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने अन् रोख रक्कम लांबवली; बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल
Uncategorized

पोलन पेठेत दुकान फोडून ६४ हजारांची रोकड लंपास

November 4, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

पाचोऱ्यात महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावली

November 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा

अमळनेरमध्ये घरासमोरून ४५ हजारांची मोटारसायकल चोरी

November 4, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

शेतातील शेडमधून कपाशी आणि बॅटरी चोरीला

November 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon