गणेश कॉम्प्लेक्स परिसरातील घटना; ३० हजारांची एचएफ डिलक्स मोटारसायकल लंपास
चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गणेश कॉम्प्लेक्स पार्किंगमधून अज्ञात चोरट्यांनी ३० हजार रुपये किमतीची एचएफ डिलक्स मोटारसायकल चोरून नेल्याची घटना समोर आली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश चैत्राम गुजर (वय ३६, व्यवसाय-मजुरी, रा. ओझर, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) यांची काळ्या रंगाची एचएफ डिलक्स कंपनीची मोटारसायकल (क्रमांक MH-19-DM-4508) ही गणेश कॉम्प्लेक्स पार्किंगमध्ये उभी करण्यात आली होती.
१० सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ८ वाजेपासून रात्री ८.३० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी पार्किंगमधून सदर मोटारसायकल चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी २५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १.०८ वाजता चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४५१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून मोटारसायकलचा शोध सुरू केला आहे. परिसरातील उपलब्ध माहितीच्या आधारे चोरट्याचा शोध घेण्यात येत आहे.
या गुन्ह्याचा तपास पो.कॉ. २७५१ दिलीप शिवाजी राक्षे, चाळीसगाव शहर पोलीस ठाणे, करीत आहेत.









