• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सुरळीत वीजपुरवठ्यासह वीजबिल वसुलीस प्राधान्य द्या : संचालक राजेंद्र पवार यांचे निर्देश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 24, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
सुरळीत वीजपुरवठ्यासह वीजबिल वसुलीस प्राधान्य द्या : संचालक राजेंद्र पवार यांचे निर्देश

जळगाव ( प्रतिनिधी ) – वीजग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करण्याबरोबरच थकबाकी व चालू वीजबिल वसुलीवर विशेष लक्ष केंद्रित करावे तसेच ग्राहकांच्या तक्रारींची तत्परतेने दखल घेऊन त्या वेळेत निकाली काढाव्यात, असे निर्देश महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी दिले.
        येथील विद्युत भवनात मंगळवारी (२२ सप्टेंबर) आयोजित जळगाव परिमंडलाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी, अधीक्षक अभियंता मदन सांगळे, अधीक्षक अभियंता संजय सरग, अधीक्षक अभियंता सायस दराडे यांच्यासह परिमंडलातील सर्व विभागीय कार्यकारी अभियंते, विविध विभागांचे प्रमुख आणि लेखा अधिकारी उपस्थित होते.
        संचालक राजेंद्र पवार म्हणाले की, आगामी रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कृषिपंपांसाठी सुरळीत वीजपुरवठा व्हावा यासाठी उपकेंद्रातील सर्व यंत्रणा सुस्थितीत ठेवावी. नादुरुस्त झालेली रोहित्रे (ट्रान्सफॉर्मर) ठरवून दिलेल्या कालमर्यादेत तातडीने बदलून द्यावीत. वितरण रोहित्रे वारंवार नादुरुस्त होऊ नयेत यासाठी अनधिकृत वीजवापरावर तात्काळ कारवाई करावी. वीजपुरवठा खंडित झाल्यास तो लवकरात लवकर पूर्ववत करावा तसेच सर्व क्षेत्रीय अभियंते व कर्मचाऱ्यांनी वीजग्राहकांच्या तक्रारींना तात्काळ प्रतिसाद दिला पाहिजे. ग्राहकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष किंवा कामात दिरंगाई केल्यास ती अजिबात खपवून घेतली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
        
ग्राहकांना अचूक वीजबिल तसेच स्मार्ट मीटरचे सर्व फायदे देण्यासाठी सर्व सदोष मीटर्स तातडीने बदला. व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांचे जुने मीटर काढून नवीन स्मार्ट मीटर बसवण्याच्या मोहिमेला वेग देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. महावितरणचा संपूर्ण आर्थिक डोलारा वीजबिल वसुलीवरच अवलंबून असल्याने चालू बिलांसह थकबाकी वसुलीसाठी प्रभावी मोहीम राबवावी, तसेच थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केलेले ग्राहक अनधिकृतपणे वीज वापरत असल्यास त्यांच्यावर नियमानुसार कठोर कारवाई करावी, असे निर्देश श्री. पवार यांनी दिले. यावेळी त्यांनी‘स्मार्ट योजना‘, ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना‘ आणि ‘वाहिनी विलगीकरण‘ या योजनांचाही आढावा घेतला.
        वीजग्राहकांना जलद व पारदर्शक सेवा देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात महावितरणकडून विशेष सेवा कक्ष सुरू करण्यात आले असून येत्या १७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत ‘सेवा सेतू’ आणि ‘सेवा संकल्प अभियान’ राबवले जात आहे. या अभियानांतर्गत ‘पीएम सूर्यघर मोफत वीज योजना‘, ‘स्मार्ट योजना‘, ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजना‘ आणि ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०‘ यासाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी, आर्थिक फायदे व सौर संच बसविण्याच्या प्रक्रियेचे मार्गदर्शन जागेवरच केले जात आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन संचालक श्री. राजेंद्र पवार यांनी केले.

उपकेंद्राचे काम मुदतीत पूर्ण करा

संचालक राजेंद्र पवार यांनी तालुक्यातील शिरसोली येथे एआयआयबी योजनेतून सुरू असलेल्या ३३ केव्ही उपकेंद्राच्या कामाची पाहणी केली. उपकेंद्राची स्थापत्य व तांत्रिक कामे दर्जेदार करा. दिलेल्या मुदतीत उपकेंद्राचे काम पूर्ण करा, असे निर्देश श्री.पवार यांनी अधिकाऱ्यांना दिले. 

कॅप्शन : जळगाव परिमंडलाच्या आढावा बैठकीत बोलताना संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार. सोबत मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी व इतर अधिकारी.


 

 

Tags: #jalgaon mahavitran #maharashtra #bharat
Previous Post

रामानंदनगरात घरफोडी; ८९ हजारांचा मुद्देमाल लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सुरळीत वीजपुरवठ्यासह वीजबिल वसुलीस प्राधान्य द्या : संचालक राजेंद्र पवार यांचे निर्देश
1xbet russia

सुरळीत वीजपुरवठ्यासह वीजबिल वसुलीस प्राधान्य द्या : संचालक राजेंद्र पवार यांचे निर्देश

September 24, 2026
रामानंदनगरात घरफोडी; ८९ हजारांचा मुद्देमाल लंपास
1xbet russia

रामानंदनगरात घरफोडी; ८९ हजारांचा मुद्देमाल लंपास

September 24, 2026
पैशांसाठी ७२ वर्षीय महिलेचा कंबरेच्या पट्ट्याने गळा आवळून खून; सालदाराला अटक
1xbet russia

पैशांसाठी ७२ वर्षीय महिलेचा कंबरेच्या पट्ट्याने गळा आवळून खून; सालदाराला अटक

September 24, 2026
महापौरांची पाहणी : कृत्रिम तलाव निर्मितीची महापालिकेची तयारी पूर्ण
1xbet russia

महापौरांची पाहणी : कृत्रिम तलाव निर्मितीची महापालिकेची तयारी पूर्ण

September 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सुरळीत वीजपुरवठ्यासह वीजबिल वसुलीस प्राधान्य द्या : संचालक राजेंद्र पवार यांचे निर्देश

सुरळीत वीजपुरवठ्यासह वीजबिल वसुलीस प्राधान्य द्या : संचालक राजेंद्र पवार यांचे निर्देश

September 24, 2026
रामानंदनगरात घरफोडी; ८९ हजारांचा मुद्देमाल लंपास

रामानंदनगरात घरफोडी; ८९ हजारांचा मुद्देमाल लंपास

September 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon