रेल्वे अपघातात ४८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू ; अकस्मात मृत्यूची नोंद

जळगाव | प्रतिनिधी : रेल्वे अपघातात गंभीर जखमी झालेल्या ४८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मृत व्यक्तीचे नाव नवल दशरथ गोपाळ (वय ४८, रा. फत्तेपूर, जि. जळगाव) असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ ऑगस्ट २०२६ रोजी रेल्वे अपघातात जखमी झालेल्या नवल गोपाळ यांना उपचारासाठी जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
या संदर्भात रुग्णालयातील मुख्य वैद्यकीय अधिकारी (CMO) डॉ. अमोल पाटील यांनी रामानंद नगर पोलिसांना माहिती दिल्यानंतर अकस्मात मृत्यू रजिस्टर क्र. ५१/२०२६ नुसार भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अंतर्गत नोंद करण्यात आली आहे.या प्रकरणाचा तपास आरपीएसओ शरद वंजारी करीत आहेत.









