• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

चोपडा तालुक्यातील वडी गावात शेताच्या बांधावरून दंगल; शेती अवजारांनी पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला, ८ जणांवर गुन्हा दाखल!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 5, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; साडेचार लाखांच्या मुद्देमालासह ट्रॅक्टर जप्त

अडावद पोलिसांत गुन्हा नोंद; मारहाणीत दोघे गंभीर जखमी, परिसरात खळबळ

अडावद (प्रतिनिधी): चोपडा तालुक्यातील वडी गावाजवळील ताराचंद नगर भागात शेताच्या सामायिक बांधाच्या वादातून ८ जणांच्या टोळक्याने एका वृद्ध शेतकऱ्यासह त्यांच्या मुलावर शेती अवजारांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात पिता-पुत्र दोघेही गंभीर जखमी झाले असून, अडावद पोलीस ठाण्यात दंगलीसह विविध कलमांखाली ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेताच्या सामायिक बांधावरून वाद पेटला

मिळालेल्या माहितीनुसार, वडी येथील रहिवासी सुभाष अर्जुन बडगुजर (वय ६०) आणि आरोपींचे शेत लागून असून त्यांच्यात सामायिक बांधावरून जुना वाद आहे. ३ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजेच्या सुमारास याच वादावरून दोन्ही गट आमनेसामने आले. वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून सुभाष बडगुजर आणि त्यांचा मोठा मुलगा राजेंद्र बडगुजर यांच्यावर हल्ला चढवला.

शेती अवजारांनी चेहऱ्यावर आणि हातापायावर वार

आरोपींनी हातातील शेती कामाच्या तीक्ष्ण अवजारांनी फिर्यादी सुभाष बडगुजर यांच्या चेहऱ्यावर गंभीर वार केले. तसेच त्यांचा मुलगा राजेंद्र हा वडिलांना वाचवण्यासाठी मधे पडला असता, त्यालाही टोळक्याने घेरून शेतीच्या अवजारांनी हातावर आणि पायावर बेदम मारहाण करून रक्तबंबाळ केले. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.

८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल; ‘ई-साक्ष’चा वापर

याप्रकरणी जखमी वृद्ध शेतकरी सुभाष अर्जुन बडगुजर (वय ६०, रा. वडी, ता. चोपडा, जि. जळगाव) यांनी ४ जुलै रोजी दुपारी ४.३१ वाजता अडावद पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गावातीलच ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आरोपींची नावे:- सुनील परशुराम सुलताने, निखिल परशुराम सुलताने, चेतन रतिलाल सुलताने, विजय गोपाळ सुलताने, कमलाकर गोपाळ सुलताने, सुमित माधवराव सुलताने, परशुराम राघव सुलताने, ज्ञानेश्वर परशुराम सुलताने (सर्व रा. वडी, ता. चोपडा).

या सर्वांविरुद्ध अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १४३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ११८(१) (घातक शस्त्राने दुखापत करणे), १८९(२) (बेकायदेशीर जमाव), १९१(२) (दंगल), १९०, ३५२, आणि ३५१(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याची नोंद करताना पोलिसांनी ‘ई-साक्ष’ प्रणालीचा वापर केला आहे.

या घटनेमुळे वडी गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अडावद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) प्रशांत मधुकर कंडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल (पोहेकॉ/३११६) विनोद धनगर पुढील तपास करत आहेत. या गुन्ह्यात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

Tags: #aadavad crime news #chopda #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

भुसवाळात चालत्या बसमध्ये धाडसी चोरी! ७१ वर्षीय वृद्धाच्या खिशातून ३.६० लाखांचे ९ तोळे सोने लंपास

Next Post

धरणगावात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! चालकाने निष्काळजीपणे ट्रक मागे घेत ७५ वर्षीय वृद्धाला चिरडले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

धरणगावात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! चालकाने निष्काळजीपणे ट्रक मागे घेत ७५ वर्षीय वृद्धाला चिरडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

धरणगावात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! चालकाने निष्काळजीपणे ट्रक मागे घेत ७५ वर्षीय वृद्धाला चिरडले

July 5, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; साडेचार लाखांच्या मुद्देमालासह ट्रॅक्टर जप्त
1xbet russia

चोपडा तालुक्यातील वडी गावात शेताच्या बांधावरून दंगल; शेती अवजारांनी पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला, ८ जणांवर गुन्हा दाखल!

July 5, 2026
किरकोळ कारणावरून हॉटेलच्या मॅनेजरला शिवीगाळ करून केली प्रचंड तोडफोड !
1xbet russia

भुसवाळात चालत्या बसमध्ये धाडसी चोरी! ७१ वर्षीय वृद्धाच्या खिशातून ३.६० लाखांचे ९ तोळे सोने लंपास

July 5, 2026
यावल तालुका मोतीबिंदूमुक्त करण्यासाठी विशेष अभियान; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे
1xbet russia

महादेव हॉस्पिटलतर्फे पाठीच्या कण्यावरील आजारांवर शिबिर

July 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

धरणगावात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! चालकाने निष्काळजीपणे ट्रक मागे घेत ७५ वर्षीय वृद्धाला चिरडले

July 5, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; साडेचार लाखांच्या मुद्देमालासह ट्रॅक्टर जप्त

चोपडा तालुक्यातील वडी गावात शेताच्या बांधावरून दंगल; शेती अवजारांनी पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला, ८ जणांवर गुन्हा दाखल!

July 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!