जळगाव (प्रतिनिधी):- शहरातील सुप्रिम कॉलनी परिसरातून भररात्री घरासमोर लावलेली दुचाकी आणि शेजारील पत्री शेडचे दुकान उचकावून पितळाचे तुकडे चोरून नेणाऱ्या संशयित चोरट्याला एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक केली आहे. शाहरुख खान सलीम खान (वय २६, रा. तांबापुरा, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून ३१ हजार ३०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सुप्रिम कॉलनीतील रहिवासी आणि गॅरेज व्यावसायिक दस्तगिर अल्लाउद्दीन पिंजारी (वय ४३) हे २९ जून रोजी रात्री आपले काम आटोपून घरी आले होते. त्यांनी आपली एमएच १९ बीसी ५१६२ क्रमांकाची दुचाकी नेहमीप्रमाणे घरासमोर पार्क केली होती. दुसऱ्या दिवशी पहाटेच्या सुमारास त्यांना आपली दुचाकी जाग्यावर दिसून आली नाही.
त्यांनी परिसरात शोध घेतला असता, त्यांच्या घराशेजारीच असलेले खान रिजवान खान अजहर (रा. फातेमा नगर) यांच्या मालकीचे पत्री शेडचे दुकान देखील चोरट्यांनी उचकटल्याचे समोर आले. चोरट्यांनी या दुकानातून ९ किलो वजनाचे पितळाचे जुने बारीक तुकडे आणि पिनांचे बटन असा ऐवज चोरून नेला होता. दुचाकी आणि दुकानातील पितळ मिळून एकूण ३१ हजार ३०० रुपयांची चोरी झाल्याची खात्री पटल्यानंतर दस्तगिर पिंजारी यांनी ३० जून रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पिंजारी यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसात अज्ञातांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली. गुन्हा दाखल होताच पोलीस उपनिरीक्षक आणि गुन्हे शोध पथकाने तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे ही चोरी तांबापुरा भागातील शाहरुख खान सलीम खान याने केल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी तात्काळ तांबापुरातून संशयित शाहरुख खान याच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला असून त्याची पुढील चौकशी सुरू आहे.