• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

केरळी महिला ट्रस्टच्या अयप्पा स्वामी मंदिरात २३ नोव्हेंबरपासून कार्तिक पौर्णिमा उत्सव

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 21, 2026
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
केरळी महिला ट्रस्टच्या अयप्पा स्वामी मंदिरात २३ नोव्हेंबरपासून कार्तिक पौर्णिमा उत्सव


२४ नोव्हेंबरला पौर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्राचा शुभयोग; मंदिरात पूजा-अभिषेकाची तयारी, भाविकांसाठी दर्शनाची सुविधा

जळगाव,(प्रतिनिधी) : निवृत्तीनगर येथील केरळी महिला ट्रस्टच्या अयप्पा स्वामी मंदिरात सोमवार, दि. २३ नोव्हेंबरपासून कार्तिक पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ होणार आहे. रात्री ११.३० वाजता पौर्णिमा तिथी सुरू होत असून, २४ नोव्हेंबर रोजी पौर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्राचा विशेष शुभयोग जुळून येत आहे. या पार्श्वभूमीवर मंदिरात विविध धार्मिक विधी, पूजा-अभिषेक आणि आकर्षक सजावटीची तयारी सुरू आहे.यंदा पौर्णिमा तिथी २३ नोव्हेंबर रोजी रात्री ११.३० वाजता सुरू होऊन २४ नोव्हेंबर रोजी रात्री ९.४५ वाजेपर्यंत राहणार आहे. कृत्तिका नक्षत्रयुक्त पौर्णिमेचा शुभ मुहूर्त २४ नोव्हेंबर रोजी पहाटे २.०७ ते रात्री ९.४५ वाजेपर्यंत आहे. त्यानंतर रात्री ९.४५ वाजता कार्तिक नक्षत्राला प्रारंभ होऊन ते रात्री १२.३० वाजेपर्यंत राहणार आहे. केरळमधील गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली या उत्सवाचा शुभमुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील हे एकमेव अयप्पा स्वामी मंदिर असून, येथे प्राणप्रतिष्ठा शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात आली आहे. जानेवारी २००० मध्ये तामिळनाडू येथील गुरुजींच्या हस्ते मंदिरातील मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. मंदिरात महाबलीपुरम येथून आणलेली कार्तिकस्वामींची मूर्ती, कोट्टायम तंथनम प्रतिकृती, मदुराई मीनाक्षी देवी आणि गुरुवायूर श्री विष्णू यांच्या मूर्ती विराजमान आहेत.कार्तिक पौर्णिमेनिमित्त मंदिरात धन, सोने आणि चांदी अशा तीन प्रकारचे अभिषेक केले जातात. यासाठी भाविकांकडून चिल्लर नाणी संकलित केली जातात. चेन्नईहून विशेषतः मागविण्यात आलेल्या १०८ नाण्यांच्या माध्यमातून सोने आणि चांदीचा अभिषेक केला जातो. या पवित्र काळात अयप्पा स्वामींचे दर्शन घेणे शुभ मानले जात असल्याने दरवर्षी हजारो भाविक नवसपूर्तीसाठी मंदिरात येतात. उत्सव काळात शहरातील मान्यवरांच्या हस्ते विविध पूजा आणि अभिषेक विधी पार पडणार आहेत.गेल्या २५ वर्षांपासून केरळी परंपरेनुसार कार्तिक पौर्णिमेला मंदिराची विशेष सजावट करून ते भाविकांसाठी खुले ठेवले जाते. जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणार्‍या या मंदिरात नवग्रहांसह अन्य देवतांची मंदिरेही असून, ती वर्षभर भाविकांसाठी दर्शनाकरिता खुली असतात.यंदाच्या उत्सवासाठी मंदिर परिसरात आकर्षक सजावट, रोषणाई, मंडप उभारणी आणि धार्मिक विधींची तयारी अंतिम टप्प्यात आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अयप्पा स्वामींचे दर्शन घ्यावे आणि उत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केरळी महिला ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्ष सौ. वासंती अय्यर (मो. ९४०५१४३२३५) यांच्याशी संपर्क साधावा.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

जळगावकरांसाठी पंचतारांकित सुविधांचा अनुभव : ‘हॉटेल राविस्ता’ आजपासून सेवेत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

केरळी महिला ट्रस्टच्या अयप्पा स्वामी मंदिरात २३ नोव्हेंबरपासून कार्तिक पौर्णिमा उत्सव
खान्देश

केरळी महिला ट्रस्टच्या अयप्पा स्वामी मंदिरात २३ नोव्हेंबरपासून कार्तिक पौर्णिमा उत्सव

November 21, 2026
जळगावकरांसाठी पंचतारांकित सुविधांचा अनुभव : ‘हॉटेल राविस्ता’ आजपासून सेवेत
Uncategorized

जळगावकरांसाठी पंचतारांकित सुविधांचा अनुभव : ‘हॉटेल राविस्ता’ आजपासून सेवेत

November 21, 2026
लाकडाची बल्ली उचलल्याच्या कारणावरून लोखंडी रॉडने मारहाण; उपचारादरम्यान ३९ वर्षीय तरुणाचा मृत्यू!
क्राईम

लाकडाची बल्ली उचलल्याच्या कारणावरून लोखंडी रॉडने मारहाण; उपचारादरम्यान ३९ वर्षीय तरुणाचा मृत्यू!

November 21, 2026
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त
क्राईम

यावलमध्ये अंत्ययात्रा अडविल्याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी

November 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

केरळी महिला ट्रस्टच्या अयप्पा स्वामी मंदिरात २३ नोव्हेंबरपासून कार्तिक पौर्णिमा उत्सव

केरळी महिला ट्रस्टच्या अयप्पा स्वामी मंदिरात २३ नोव्हेंबरपासून कार्तिक पौर्णिमा उत्सव

November 21, 2026
जळगावकरांसाठी पंचतारांकित सुविधांचा अनुभव : ‘हॉटेल राविस्ता’ आजपासून सेवेत

जळगावकरांसाठी पंचतारांकित सुविधांचा अनुभव : ‘हॉटेल राविस्ता’ आजपासून सेवेत

November 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon