• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

९०० रुपयांच्या वादाने घेतला चिमुकल्याचा बळी; आव्हाने शिवारातील हृदयद्रावक घटना

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 27, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

दोघांच्या भांडणात सहा वर्षीय वंश बारेला याचा नाहक गेला जीव ; आरोपीला तात्काळ अटक

जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव तालुक्यातील आव्हाने शिवारात अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून अवघ्या ९०० रुपयांच्या वादातून झालेल्या भांडणात निष्पाप सहा वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मृत मुलाचे नाव वंश सुनील बारेला (वय ६, रा. उनपदेव, अडावद, ता. चोपडा) असे आहे. तर या प्रकरणी मच्छिंद्र रमण पाटील (वय ३२, रा. आव्हाने) याला जळगाव तालुका पोलिसांनी तात्काळ अटक केली असून त्याच्याकडील लाकडी दांडकाही जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आव्हाने शिवारातील म्हशींच्या गोठ्याचे व शेताचे रक्षण करण्यासाठी बारेला कुटुंब गेल्या दीड वर्षांपासून तेथे वास्तव्यास आहे. या गोठ्यात काम करणारा भावेश धनगर याच्याकडे आरोपी मच्छिंद्र पाटील याचे ९०० रुपये येणे होते.

शुक्रवारी या पैशांच्या कारणावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर आरोपीने जवळील लाकडी दांडक्याने भावेश धनगर याच्यावर वार केला. मात्र, भावेशने तो वार चुकवला. याचवेळी जवळच उभा राहून भांडण पाहत असलेला वंश बारेला याच्या अंगावर दांडका लागला.

या फटक्यात वंश गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी मच्छिंद्र रमण पाटील याला ताब्यात घेत अटक केली. या घटनेमुळे आव्हाने परिसरात शोककळा पसरली असून एका क्षुल्लक वादातून निष्पाप चिमुकल्याचा जीव गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


 

 

Previous Post

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

९०० रुपयांच्या वादाने घेतला चिमुकल्याचा बळी; आव्हाने शिवारातील हृदयद्रावक घटना

June 27, 2026
आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न
1xbet russia

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

June 27, 2026
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल
1xbet russia

शेताच्या बांधाच्या वादातून वृद्ध शेतकऱ्यासह कुटुंबीयांना मारहाण

June 27, 2026
जुन्या भांडणाच्या कारणावरून दापोऱ्याच्या तरुणावर चॉपरने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

जुन्या भांडणाच्या कारणावरून दापोऱ्याच्या तरुणावर चॉपरने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

९०० रुपयांच्या वादाने घेतला चिमुकल्याचा बळी; आव्हाने शिवारातील हृदयद्रावक घटना

June 27, 2026
आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

June 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon