• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

जळगाव विधान परिषद निवडणूक: शिवसेना शिंदे गटातील बंडखोरीमुळे लढत चतुष्कोणीय 

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 4, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगाव विधान परिषद निवडणूक: शिवसेना शिंदे गटातील बंडखोरीमुळे लढत चतुष्कोणीय 

महायुतीसमोर मोठे आव्हान

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. ही जागा महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला गेल्यानंतर महायुतीतील अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर आली आहे. शिवसेना शिंदे गटातील नेत्यांनी थेट बंडखोरीचे निशाण फडकावल्यामुळे आता जळगावची ही निवडणूक ‘चतुष्कोणीय’ ठरण्याची चिन्हे असून महायुतीसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

महायुतीत बिघाडी; भाजपच्या उमेदवारीने शिंदे गट नाराज

महायुतीतर्फे भाजपने या जागेवर आपले अधिकृत उमेदवार म्हणून नंदकिशोर (नंदू) महाजन यांना रिंगणात उतरवले आहे. मात्र, जळगावची ही जागा शिवसेना शिंदे गटाला मिळावी यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी शेवटपर्यंत जोरदार प्रयत्न केले होते. या जागेवरून त्यांच्या मुलाला उमेदवारी मिळावी अशीही राजकीय वर्तुळात चर्चा होती. परंतु, जागा भाजपला सुटल्याने शिंदे गटात तीव्र असंतोष पसरला आणि त्याचाच परिणाम म्हणून शिंदे गटाच्या बंडखोरांनी निवडणुकीत उडी घेतली आहे.

भाजप उमेदवाराच्या अर्ज दाखल करण्याच्या शक्तिप्रदर्शनाला गुलाबराव पाटील आणि त्यांचे समर्थक गैरहजर राहिले होते. यानंतर डॅमेज कंट्रोलसाठी भाजप नेत्यांनी त्यांची भेट घेतली असता, गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी बोलताना भाजपला खडे बोल सुनावले. “नवरीवाले नेहमी आम्हीच व्हावे, असे नाही…!

जळगावमध्ये भाजपच्या जशा अपेक्षा आहेत, तसेच राज्यात इतरत्र आमचेही हक्क आहेत,” अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. तसेच बंडखोरी रोखण्याची जबाबदारी दोन्ही बाजूची असल्याचे सांगत त्यांनी भाजपला सबुरीचा सल्ला दिला.

दुसरीकडे, महाविकास आघाडीमध्ये बऱ्याच चर्चांनंतर ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सोडण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा या जागेवरील दावा फोल ठरल्याने तिथेही अंतर्गत पातळीवर थोडी नाराजी असली, तरी मविआने ही जागा ठाकरे गटाला देऊन आपली एकजूट दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

लढतीचे स्वरूप काय असेल?

शिंदे गटातील बंडखोर उमेदवारांनी अर्ज कायम ठेवल्यास ही निवडणूक अधिकृत भाजप उमेदवार, शिवसेना ठाकरे गट, आणि बंडखोर अशा प्रमुख चार उमेदवारांमध्ये विभागली जाऊन ‘चतुष्कोणीय’ होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारांवर (नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य) मजबूत पकड असलेल्या गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघात शिंदे गटाची बंडखोरी भाजपच्या अधिकृत उमेदवाराला भारी पडू शकते, अशी शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जात आहे.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर जळगावमधील महायुतीतील ही अंतर्गत फूट आणि बंडखोरी भाजप उमेदवाराची डोकेदुखी वाढवणारी ठरणार असून आगामी काही दिवसांत वरिष्ठ पातळीवरून यावर काय तोडगा निघतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रिंगणात असलेले प्रमुख उमेदवार
नंदू महाजन, भाजप
शरद तायडे, शिवसेना ठाकरे गट
अनिल चौधरी, अपक्ष
रेश्मा काळे, शिवसेना शिंदे गट बंडखोर उमेदवार

Tags: jalgaon-vidhan-parishad-nivdnuk
Previous Post

जळगाव हादरले! महाविद्यालयीन तरुणीला व्यसनाच्या जाळ्यात ओढून वारंवार अत्याचार

Next Post

डिझेलऐवजी इलेक्ट्रिक वाहन; डॉ. उल्हास पाटील संस्थेचा पर्यावरणपूरक निर्णय

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डिझेलऐवजी इलेक्ट्रिक वाहन; डॉ. उल्हास पाटील संस्थेचा पर्यावरणपूरक निर्णय

डिझेलऐवजी इलेक्ट्रिक वाहन; डॉ. उल्हास पाटील संस्थेचा पर्यावरणपूरक निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई; एमडी ड्रग्जसह तिघांना अटक
1xbet russia

जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई; एमडी ड्रग्जसह तिघांना अटक

June 4, 2026
महाराष्ट्राची विक्रमी झेप; सौर कृषिपंपांमध्ये गाठला देशात सर्वाधिक १० लाखांचा टप्पा
1xbet russia

महाराष्ट्राची विक्रमी झेप; सौर कृषिपंपांमध्ये गाठला देशात सर्वाधिक १० लाखांचा टप्पा

June 4, 2026
डिझेलऐवजी इलेक्ट्रिक वाहन; डॉ. उल्हास पाटील संस्थेचा पर्यावरणपूरक निर्णय
1xbet russia

डिझेलऐवजी इलेक्ट्रिक वाहन; डॉ. उल्हास पाटील संस्थेचा पर्यावरणपूरक निर्णय

June 4, 2026
जळगाव विधान परिषद निवडणूक: शिवसेना शिंदे गटातील बंडखोरीमुळे लढत चतुष्कोणीय 
1xbet russia

जळगाव विधान परिषद निवडणूक: शिवसेना शिंदे गटातील बंडखोरीमुळे लढत चतुष्कोणीय 

June 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई; एमडी ड्रग्जसह तिघांना अटक

जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई; एमडी ड्रग्जसह तिघांना अटक

June 4, 2026
महाराष्ट्राची विक्रमी झेप; सौर कृषिपंपांमध्ये गाठला देशात सर्वाधिक १० लाखांचा टप्पा

महाराष्ट्राची विक्रमी झेप; सौर कृषिपंपांमध्ये गाठला देशात सर्वाधिक १० लाखांचा टप्पा

June 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!