• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दारुच्या व्यसनातून कौटुंबिक वाद अन् पतीचा गळा आवळून खून

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 7, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
दारुच्या व्यसनातून कौटुंबिक वाद अन् पतीचा गळा आवळून खून

जळगावातील केसी पार्क परिसरातील धक्कादायक घटना; पत्नीला पोलिसांनी घेतले ताब्यात

जळगाव (प्रतिनिधी) :-  दारुच्या नशेत वारंवार पत्नी व कुटुंबीयांना त्रास देणाऱ्या पतीचा पत्नीनेच गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना शहरातील कानळदा रोडवरील केसी पार्क परिसरात उघडकीस आली आहे. भरत नामदेव पाटील (वय ५८) असे मृताचे नाव असून, या प्रकरणी त्यांची पत्नी मनिषा भरत पाटील (वय ४५) हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. सुरुवातीला भरत पाटील यांचा मृत्यू पलंगावरून पडल्याने झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी शवविच्छेदनादरम्यान मानेवर गळा आवळल्याच्या खुणा आढळून आल्याने हा प्रकार उघड झाला. भरत पाटील हे पत्नी आणि दोन मुलांसह वास्तव्यास होते. पत्नी शहरातील एका कापड दुकानात काम करत होती, तर दोन्ही मुले एमआयडीसीतील कंपनीत नोकरीला आहेत. भरत पाटील यांना दारुचे व्यसन होते आणि ते वारंवार कुटुंबीयांसोबत वाद घालत असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

मंगळवारी रात्री मनिषा पाटील कामावरून घरी आल्यानंतर भरत पाटील हे दारुच्या नशेत होते. दोघांमध्ये जोरदार वाद झाला. संतापाच्या भरात मनिषा पाटील यांनी दोरीच्या सहाय्याने पतीचा गळा आवळल्याचे पोलिसांनी सांगितले. गळा आवळल्यानंतर भरत पाटील हे पलंगावरून खाली पडले. डोक्याला जबर मार लागल्याने अंतर्गत रक्तस्त्राव झाला आणि त्यांच्या कान व नाकातून रक्तस्राव सुरू झाला.

परिसरातील एका तरुणाने त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाची पाहणी केली असता गळा आवळल्याचा संशय बळावला. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात श्वास गुदमरल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद बदलून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी मनिषा पाटील यांची चौकशी केली असता, पतीच्या सततच्या मानसिक आणि कौटुंबिक त्रासाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलल्याची कबुली त्यांनी दिल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, भरत पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी दारुच्या नशेत राहते घर विक्रीचा व्यवहार केल्याने कुटुंबात मोठे वाद निर्माण झाले होते. या सततच्या वादातूनच ही घटना घडल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.


 

 

Previous Post

जळगाव बसस्थानकात ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणारे दोघे जेरबंद

Next Post

वडापाव विक्रेत्यावर हल्ला; चांदीची चैन हिसकावली, तिघांविरोधात गुन्हा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वडापाव विक्रेत्यावर हल्ला; चांदीची चैन हिसकावली, तिघांविरोधात गुन्हा

वडापाव विक्रेत्यावर हल्ला; चांदीची चैन हिसकावली, तिघांविरोधात गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

जळगावात चंदू अण्णा नगरातून दुचाकीची चोरी; जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

August 6, 2026
प्रेमसंबंधातून मानसिक छळ; तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा
1xbet russia

प्रेमसंबंधातून मानसिक छळ; तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा

August 6, 2026
शालकासह दोघांच्या त्रासाला कंटाळून प्रौढाची आत्महत्या, गुन्हा दाखल
1xbet russia

चौबारी-गलवाडे परिसरातून तीन दुचाकींची चोरी; ६७ हजारांचा ऐवज लंपास

August 6, 2026
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; विवाहास नकार देत दुचाकीही हडप केल्याचा आरोप
1xbet russia

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; विवाहास नकार देत दुचाकीही हडप केल्याचा आरोप

August 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

जळगावात चंदू अण्णा नगरातून दुचाकीची चोरी; जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

August 6, 2026
प्रेमसंबंधातून मानसिक छळ; तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा

प्रेमसंबंधातून मानसिक छळ; तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा

August 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon