• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पोलीस चौकीसमोरच औषधांचे दुकान फोडले, रोकडसह सीसीटीव्हीचा डिव्हिआरही लांबवला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 28, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पोलीस चौकीसमोरच औषधांचे दुकान फोडले, रोकडसह सीसीटीव्हीचा डिव्हिआरही लांबवला

 

जळगावच्या मध्यवर्ती भागात चोरट्यांचा धुमाकूळ

जळगाव : शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या शनिपेठ परिसरात भिलपुरा पोलीस चौकीच्या अगदी समोर चोरट्यांनी मंगळवारी (दि. २८) पहाटे चार वाजेच्या सुमारास जोरदार धुमाकूळ घातला. चोरट्यांनी एकाच रांगेतील तीन दुकाने फोडण्याचा प्रयत्न केला असून, यात ‘पद्मालय मेडिकल’मधून रोख रकमेसह साहित्याची चोरी केली आहे. विशेष म्हणजे, एका सतर्क नागरिकाने या चोरट्यांचा पाठलाग केला, मात्र चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले.

मंगळवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास कारमधून आलेल्या तीन संशयित चोरट्यांनी शनिपेठ परिसरात भिलपुरा पोलीस चौकी समोरचे मेडिकल दुकान लक्ष्य केले. त्यांनी येथील पद्मालय मेडिकलचे कुलूप आणि कोंडा न तोडता शटर वाकवून आत प्रवेश केला. दुकानाच्या गल्ल्यातील साधारण ८ ते १० हजार रुपयांची रोकड, १६ कॅमेऱ्यांचा डीव्हीआर (DVR), कोल्ड्रिंक्सच्या बाटल्या आणि आईस्क्रीम असा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवला. यानंतर त्यांनी शेजारील इतर दोन दुकानेही फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना यश आले नाही.

नागरिकाने केला पाठलाग

चोरी होत असताना परिसरातील एका नागरिकाला जाग आली. त्याने प्रसंगावधान राखून चोरट्यांचा पाठलाग केला. ममुराबाद पुलाखालील मंदिरापर्यंत हा पाठलाग सुरू होता, मात्र चोरटे कारमध्ये असल्याने वेगाने पसार झाले. या सतर्क नागरिकाने चोरट्यांच्या कारचा क्रमांक नोट केला असून, तो एमएच ०२ बीवाय ३०३२ असा आहे, अशी माहिती मेडिकलचे मालक दिलीप वाणी यांनी “केसरीराज” शी बोलताना दिली.

पोलीस तपासाला वेग

शनिपेठ पोलीस स्टेशनपासून हा परिसर हाकेच्या अंतरावर आहे. पोलीस चौकीसमोरच चोरीची घटना घडल्याने व्यापाऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी पद्मालय मेडिकलचे संचालक दिलीप अनंत वाणी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कारचा नंबर आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. शहराच्या मुख्य भागात चोरटे इतक्या हिंमतीने कारने येऊन चोरी करत असल्याने पोलिसांनी गस्त वाढवावी आणि या गुन्ह्याचा छडा लवकरात लवकर लावावा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

 

 

Previous Post

जिल्ह्यातील किंगमेकरचे सुपुत्र आता विधिमंडळात ? प्रतापराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जनमानसातून शुभाशीर्वाद

Next Post

हळदीच्या कार्यक्रमात वाद : भावंडांवर कोयत्याने हल्ला; दोघांवर गुन्हा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
हळदीच्या कार्यक्रमात वाद : भावंडांवर कोयत्याने हल्ला; दोघांवर गुन्हा

हळदीच्या कार्यक्रमात वाद : भावंडांवर कोयत्याने हल्ला; दोघांवर गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विधान परिषदेच्या जागांवर महायुतीतून लागणार कोणाची वर्णी ?
1xbet russia

विधान परिषदेच्या जागांवर महायुतीतून लागणार कोणाची वर्णी ?

April 28, 2026
‘एक लाखाचे पाच लाख’ देण्याचे आमिष : व्यापाऱ्याला सव्वा पाच लाखांचा गंडा
1xbet russia

‘एक लाखाचे पाच लाख’ देण्याचे आमिष : व्यापाऱ्याला सव्वा पाच लाखांचा गंडा

April 28, 2026
दारूसाठी पैसे न दिल्याने महिलेच्या डोक्यात घातला दगड
1xbet russia

दारूसाठी पैसे न दिल्याने महिलेच्या डोक्यात घातला दगड

April 28, 2026
भडगावात ‘गोमाता सन्मान’ शोभायात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद
1xbet russia

भडगावात ‘गोमाता सन्मान’ शोभायात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

April 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

विधान परिषदेच्या जागांवर महायुतीतून लागणार कोणाची वर्णी ?

विधान परिषदेच्या जागांवर महायुतीतून लागणार कोणाची वर्णी ?

April 28, 2026
‘एक लाखाचे पाच लाख’ देण्याचे आमिष : व्यापाऱ्याला सव्वा पाच लाखांचा गंडा

‘एक लाखाचे पाच लाख’ देण्याचे आमिष : व्यापाऱ्याला सव्वा पाच लाखांचा गंडा

April 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon