जळगाव ( प्रतिनिधी ) –विद्यार्थ्यांमध्ये संस्कृती, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण व्हावी, तसेच ध्वनिप्रदूषण टाळून गणेशोत्सव साजरा व्हावा, या उद्देशाने गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथे यंदा *डीजेमुक्त गणेशोत्सवाचा संकल्प* करण्यात आला. पारंपरिक वाद्यांच्या गजरात व भक्तिमय वातावरणात दिनांक *14 सप्टेंबर 2026* रोजी श्री गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली.
यावेळी *गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील सर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील सर* आणि सर् शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. मंत्रोच्चार, आरती आणि गणरायाच्या जयघोषात गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत उत्सवाची शोभा वाढवली.
*गणपती मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा व पूजा प्रा. निलेश वाणी यांनी सपत्नीक* केली.
उत्सवाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती व परंपरांचे जतन करण्यासोबतच पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवावा, असे *आवाहन प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील* यांनी केले.
. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. ..
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय,जळगाव इथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना
जळगाव : डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव येथे यंदा डीजेमुक्त गणेशोत्सवाचा संकल्प करण्यात आला. पारंपरिक वाद्यांच्या गजरात व भक्तिमय वातावरणात श्री गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली.
यावेळी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, डॉ. ज्ञानेश्वर सिंग, प्रा. सुशील चव्हान शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. मंत्रोच्चार, आरती आणि गणरायाच्या जयघोषात गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत उत्सवाची शोभा वाढवली.
. .. . .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .
पारंपरिक वाद्यांच्या गजरात डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात गणरायाचे आगमन
जळगाव, दि. १४ सप्टेंबर : गोदावरी फाउंडेशन संचालित डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, जळगाव येथे आज दि. १४ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात गणरायाचे आगमन झाले.
महाविद्यालयाचे डीन डॉ. हर्षल बोरोले यांनी सपत्नीक विधिवत पूजा-अर्चा करून गणरायाची स्थापना केली.
यावेळी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक तसेच नॉन-टीचिंग उपस्थित होते. y.. .. .. … .. .. .. .. . .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. …
*पारंपरिक वाद्यांच्या गजरात डॉ. उल्हास पाटील इंग्लीश मीडियम स्कूल भुसावळ गणरायाचे आगमन*
जळगाव, दि. १४ सप्टेंबर : गोदावरी फाउंडेशन संचालित डॉ. उल्हास पाटील इंग्लीश मीडियम स्कूल भुसावळ येथे आज दि. १४ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात गणरायाचे आगमन झाले.
पारंपरिक वाद्यांच्या गजरात तसेच उत्साहपूर्ण वातावरणात गणरायाची मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या आणि पारंपरिक वाद्यांच्या निनादात गणरायाचे महाविद्यालय परिसरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. माजी खा डॉ उल्हास पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजा-अर्चा करून गणरायाची स्थापना केली.
यावेळी प्रिन्सिपल अनघा पाटील, सर्व विद्यार्थी, शिक्षक तसेच नॉन-टीचिंग स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होता. गणरायाच्या आगमनामुळे संपूर्ण महाविद्यालय परिसर भक्तिमय आणि आनंदमय वातावरण होते.
. . .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .
*गोदावरी फाउंडेशनच्या आरोग्य संस्थेत डीजेमुक्त गणेशोत्सवाचा संकल्प; भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना*
*डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय* – येथे अधिष्ठाता डॉ प्रशांत सोळंके, प्रशासन अधिकारी प्रमोद भिरुड, संचालक डॉ एन एस आर्विकर यांचेसह संस्थेचे पदाधिकारी,डॉक्टर, प्राध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. *डॉ. उल्हास पाटील रुग्णालय*- येथे संस्था अध्यक्ष माजी खा. डॉ उल्हास पाटील, परिचारिका अधीक्षक संकेत पाटील,मनीषा खरात,वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रेमचंद पंडित यांचेसह डॉक्टर,नर्सिंग स्टाफ उपस्थित होते. *गोदावरी नर्सिंग महाविद्यालय*- येथे प्राचार्य विशाखा गणवीर,डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग प्राचार्य शिवानंद बिरादार,यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
*डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी*
येथे प्राचार्य डॉ जयवंत नागुलकर,प्रशासन अधिकारी राहुल गिरी यांचे सह सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक वर्ग उपस्थित होता. *डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथी महाविद्यालय* येथे प्रिन्सिपल डॉ. शिवानंद आठवले,डॉ. पंकज शर्मा,प्रशासन अधिकारी ललित महाजन यांचे सह डॉक्टर,प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
*डॉ गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालय*
येथे अधिष्ठाता डॉ. हर्षल बोरोले,प्रशासन अधिकारी चेतन चौधरी यांचे सह डॉक्टर,प्राध्यापक उपस्थित होते. *महादेव हॉस्पीटल जळगाव* जळगाव आकाशवाणी चौकातील महादेव हॉस्पीटल येथे माजी खा डॉ उल्हास पाटील,रुग्णालय व्यवस्थापक प्रा. एन जी चौधरी यांचे सह डॉक्टर नर्सिंग स्टाफ उपस्थित होते. आरोग्य संस्थांनी रुग्णांना सेवा देण्यासाठी शक्ती मागत पारंपरिक वाद्यांच्या गजरात व भक्तिमय वातावरणात श्री गणरायाची विधिवत स्थापना केली.











