जळगाव (प्रतिनिधी) :- जागतिक मलेरिया दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगावच्या कम्युनिटी हेल्थ नर्सिंग विभागाच्या वतीने नाशिराबाद येथे जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.
या रॅलीत विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग घेत मलेरियाविषयी जनजागृती करण्याचा संदेश दिला.रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी मलेरिया टाळा, आरोग्य सांभाळा अशा विविध घोषणाबाजी करत नागरिकांचे लक्ष वेधले. तसेच चार्ट्स व बॅनर्सच्या माध्यमातून मलेरियाचे कारण, लक्षणे आणि प्रतिबंधक उपाय यांची सविस्तर माहिती देण्यात आली.नाशिराबाद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमासाठी प्रा निर्भय मोहाड, प्रा. स्वाती गाडेगोणे,प्रा. दिव्याना पवार, प्रा.अश्लेषा मून, प्रा.रितेश पडघान, प्रा.सुमित भारंबे व प्रा. सचिन पवार यांनी मार्गदर्शन केले. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद पंधारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय पाल व डॉ. गौरव जाधव यांची उपस्थिती लाभली.या उपक्रमाला आशा कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या जनजागृती रॅलीमुळे नागरिकांमध्ये मलेरियाविषयी जागरूकता निर्माण झाली असून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी प्रेरणा मिळाली.








