• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी”

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 4, 2026
in जैन कंपनी, 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, नवी दिल्ली, भारत, महाराष्ट्र, मुंबई
0
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी”

जिंकणार कोण? शहराचा श्वास रोखणारा थरार आज शिगेला…

जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव क्रिकेट लीग २०२६ चा बहुप्रतिक्षित ग्रॅण्ड फायनल सामना आज रविवारी संध्याकाळी ६ वाजता जैन ड्रीम स्पेसेस च्या मैदानावर रंगणार आहे. अमळनेर सुहांस जायंटस व जळगाव कोगटा किंग्ज या दोन दमदार संघांमध्ये विजेतेपदासाठी टक्कर पाहायला मिळणार आहे. संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम फेरीत पोहोचलेल्या दोन्ही संघांनी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. आता हा थरारक सामना कोण जिंकणार व विजेतेपदाची ट्रॉफी कोण उंचावणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
क्वालिफायर च्या दुसऱ्या सामन्याची नाणेफेक छत्रपती शिवाजी पुरस्कार विजेत्या आयशा खान यांच्या उपस्थितीत झाले. जामनेर सातपुडा हिरोज चे कर्णधार शतायु कुलकर्णी यांने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रद्युम्न महाजनची संयमी खेळी आणि राम राठोडची फटकेबाजी यामुळे जामनेर  सातपुडा हिरोजच्या डावाला आकार दिला. जामनेर सातपुडा हिरोज संघाने निर्धारित २० षटकांत १६० धावांचा टप्पा ओलांडत प्रतिस्पर्धी संघासमोर सन्मानजनक आव्हान उभे केले होते.
सलामीवीर मानस विजय पाटील १० धावांवर बाद झाल्यानंतर, राम राठोडने आक्रमक पवित्रा घेत २८ चेंडूत ४३ धावा काढल्यात. यात त्याने ४ चौकार, ३ उत्तुंग षटकार खेचले. मात्र, एका बाजूने विकेट्स पडताना प्रद्युम्न महाजनने खिंड लढवली. त्याने ४३ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद ६१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. क्रिषी नथानीने ३३ धावांचे योगदान देत त्याला उत्तम साथ दिली. जामनेरचा डाव ५ बाद १६० धावांवर स्थिरावला.
इम्पॅक्ट प्लेयर सागर भावसार याने ४ षटकांमध्ये ३१ धावा देत २ गडी बाद केले. तर मनिष चौहाण याने ४ षटकांत फक्त २५ धावा देत २ गडी बाद केले. आव्हानाचा पाठलाग करताना जळगाव कोगटा किंग्ज च्या सलामीची फळी अवघ्या १२ धावांवर असताना फुटली पहिला गडी अर्शद खान ने जितेंद्र नाईकच्या रूपाने घेतला. स्पर्धेत ऐन भरात असलेल्या ओम भोसलेने फटकेबाजीला सुरवात केली. मात्र त्याला नितालेश चौधरी ने विकेट देण्यास भाग पाडले. १७ चेंडू ३२ धावांवर यात ३ चौकार २ षटकार लगावत ओम भोसले ची आऊट झाला. यानंतर जगदीश झोपे यांनी कर्णधाराची साजेशी खेळी केली. २५ चेंडूमध्ये ५ चौकार व ४ षटकार यांच्या मदतीने त्याने ६१ धावा काढून संघाला विजय मिळवून दिला. जळगाव कोगटा किंग्ज ने ५ गडी राखून अवघ्या १७ व्या षटकांत सामना आपल्या बाजूने केला. जगदीश झोपे सामनावीर म्हणून सन्मानीत करण्यात आले. निखेलेश चौधरी याला ११ निर्धार चेंडू टाकल्याने तर जगदीश झोपे याला सर्वाधिक ४ षटकार लगावल्याने सन्मानीत करण्यात आले. पारितोषिक वितरणाप्रसंगी जैन इरगिशनचे मानव संसाधन विभागचे वरिष्ठ सहकारी व्ही. एम. भट यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Tags: https://kesariraj.com/grand-fainlcha-jallhosh/
Previous Post

जागतिक मलेरिया दिनानिमित्त नाशिराबाद येथे जनजागृती रॅली

Next Post

बसमध्ये दागिन्यांची चोरी करणारी महिला जेरबंद, ३ लाखांचा ऐवज हस्तगत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बसमध्ये दागिन्यांची चोरी करणारी महिला जेरबंद, ३ लाखांचा ऐवज हस्तगत

बसमध्ये दागिन्यांची चोरी करणारी महिला जेरबंद, ३ लाखांचा ऐवज हस्तगत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दिवाळी निमित्ताने आकाशवाणी जळगाव व चांदोरकर प्रतिष्ठान च्या वतीने “पाडवा पहाटची” या प्रात:कालिन मैफिलिचे आयोजन
जैन कंपनी

दिवाळी निमित्ताने आकाशवाणी जळगाव व चांदोरकर प्रतिष्ठान च्या वतीने “पाडवा पहाटची” या प्रात:कालिन मैफिलिचे आयोजन

November 6, 2026
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने सदस्यांना मोठ्या उत्साहात मिठाई वाटप
खान्देश

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने सदस्यांना मोठ्या उत्साहात मिठाई वाटप

November 6, 2026
चाळीसगाव ग्रामीण पोलिसांतर्फे ग्राम सुरक्षा दल सदस्यांना साहित्य वाटप व मार्गदर्शन; हरवलेले १२ मोबाईल मूळ मालकांना परत
खान्देश

चाळीसगाव ग्रामीण पोलिसांतर्फे ग्राम सुरक्षा दल सदस्यांना साहित्य वाटप व मार्गदर्शन; हरवलेले १२ मोबाईल मूळ मालकांना परत

November 6, 2026
जळगावचे शासकीय रुग्णालय नेत्रोपचारासह अत्याधुनिक उपचारांचे आदर्श केंद्र बनवू – पालकमंत्री गुलाबराव पाटील व मंत्री गिरीश महाजन
खान्देश

जळगावचे शासकीय रुग्णालय नेत्रोपचारासह अत्याधुनिक उपचारांचे आदर्श केंद्र बनवू – पालकमंत्री गुलाबराव पाटील व मंत्री गिरीश महाजन

November 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दिवाळी निमित्ताने आकाशवाणी जळगाव व चांदोरकर प्रतिष्ठान च्या वतीने “पाडवा पहाटची” या प्रात:कालिन मैफिलिचे आयोजन

दिवाळी निमित्ताने आकाशवाणी जळगाव व चांदोरकर प्रतिष्ठान च्या वतीने “पाडवा पहाटची” या प्रात:कालिन मैफिलिचे आयोजन

November 6, 2026
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने सदस्यांना मोठ्या उत्साहात मिठाई वाटप

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने सदस्यांना मोठ्या उत्साहात मिठाई वाटप

November 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!