जळगाव ( प्रतिनिधी ) – आकाशवाणी जळगाव च्या ५० व्या व चांदोरकर प्रतिष्ठानच्या २५ व्या वर्ष पूर्ती निमित्ताने मंगळवार दि. १० नोव्हेंबर २०२६ रोजी दिवाळी पाडवा अर्थात बली प्रतिपदा निमित्ताने पाडवा पहाट मैफिलीचे आयोजन महात्मा गांधी उद्यानात प्रात:काळी ठीक ६ वाजता करण्यात आले आहे.


या वर्षीचा कार्यक्रम आकाशवाणी, जळगाव चांदोरकर प्रतिष्ठान व कै. नथ्थूशेट चांदसरकर ट्रस्ट च्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला असून ही अभंगवाणी, नाट्यगीते, व सुगम संगीताची मैफल असणार आहे. सादरकर्ते सर्व कलाकार नाशिक चे असून आकाशवाणी जळगावचे
मान्यताप्राप्त कलाकार आहेत. त्यांची नावे पुढीलप्रमाणे आशिष रानडे, ईश्वरी दसक्कर कदडी, पूजा दसक्कर, व त्यांना साथसंगत करणारे कलाकार तबला-सुजित काळे, संवादिनी-सुभाष दसक्कर, सिंथसाइझर- विजय नेवे, ऑक्टोपॅड-नितेश पाटील हे असणार आहेत. उद्घाटन सत्राचे सूत्र संचलन दीपिका घैसास करणार आहे. पाडवा पहाट कार्यक्रमासाठी खालील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, आमदार श्री. राजूमामा भोळे, महापौर श्रीमती दीपमाला काळे, जिल्हाधिकारी-श्री. रोहन घुगे, पोलीस अधीक्षक-श्री. श्रीकांत धिवरे, आकाशवाणी जळगाव चे कार्यक्रम प्रमुख श्री. ज्ञानेश्वर बोबडे, उद्योगपती-श्री. अशोकभाऊ जैन, व कै. नथ्थू शेट चांदसरकर ट्रस्ट चे मेजर नानासाहेब वाणी, या कार्यक्रमास भवरलाल अँड कांताबाई फाऊंडेशन चे सहकार्य लाभले आहे.
सदर कार्यक्रम आकाशवाणी जळगाव वरून प्रसारित होणार असल्यामुळे वेळेवर म्हणजे ठीक ६ वाजता सुरू होणार आहे. रसिकांना नम्र विनंती आहे की त्यांनी कार्यक्रम सुरू होण्याच्या किमान १० मिनिटे आधी आसनस्थ व्हावे व सुगम संगीताच्या या अनोख्या मैफिलीचा आस्वाद घ्यावा असे आवाहन आकाशवाणी, जळगाव व स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान, चांदसरकर ट्रस्ट यांनी केले आहे.








