भुसावळ बाजारपेठ पोलिसांची मोठी कारवाई
भुसावळ (प्रतिनिधी):- भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाने मोठी कारवाई करत दुचाकी चोरी करणाऱ्या एका सराईत टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून ४ लाख ६५ हजार रुपये किमतीच्या एकूण ७ मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत.

तापी नगर, भुसावळ येथील रहिवासी आशिष विनायक झोपे यांची होंडा शाईन दुचाकी चोरीला गेल्याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना गुप्त बातमीदाराकडून संशयित आरोपींबाबत माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे डी.बी. पथकाने सापळा रचून कारवाई केली.
पोलिसांनी सुरुवातीला रवींद्र विठ्ठल भदाणे (वय २९, रा. मोहाडी, ता. जामनेर) याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने त्याचा साथीदार गजानन अशोक कोळी (वय २७, रा. नेरी दिगर, ता. जामनेर) याच्या मदतीने दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. सखोल तपासात या टोळीने जळगाव, जामनेर, नांदुरा आणि धुळे या भागांतून दुचाकी चोरल्याचे उघड झाले आहे.
पोलिसांनी ७ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. होंडा सी.बी. शाईन (MH 19 DG-6722) भुसावळ बाजारपेठ पो.स्टे., होंडा सी.बी. शाईन (MH 19 CS 8311) – जामनेर पो.स्टे.,
बजाज पल्सर १२५ (MH 19 EE 5102) – जळगाव एम.आय.डी.सी. पो.स्टे.,बजाज पल्सर 150 (MH 28 AQ 2239) – नांदुरा पो.स्टे.,
होंडा शाईन (MH 18 AS 9312) – धुळे, बजाज पल्सर 135 (विना नंबर प्लेट), सुझुकी बर्गमॅन (MH 19 ER 1832) या जप्त करण्यात आले आहेत.
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल वाघ, उद्धव डमाळे, सपोनि मंगेश जाधव आणि डी.बी. पथकातील विजय नेरकर, कांतीलाल केदारे, सचिन चौधरी, राहुल वानखेडे, चंद्रकांत रायपूरकर यांच्यासह पथकाने यशस्वी केली. आरोपी सध्या २२ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीत असून, पुढील तपास पोलीस हवालदार विजय बळिराम नेरकर करत आहेत.









