जळगाव ( प्रतिनिधी ) – डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज, जळगाव येथील बी.पी.टी. अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी जान्हवी दीपक सोमाणी हिची अखिल भारतीय विद्यापीठ योगा चॅम्पियनशिप २०२५ साठी निवड झाली आहे.
ही राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठित स्पर्धा एसव्यासा विद्यापिठ बेंगळुरू येथे आयोजित करण्यात येणार आहे.योगाभ्यासातील सातत्य, शिस्तबद्ध सराव आणि उत्कृष्ट कौशल्याच्या बळावर जान्हवीने निवड चाचणीत उल्लेखनीय कामगिरी केली. विविध योगासनांतील संतुलन, लवचिकता आणि आत्मविश्वास यामुळे तिची या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिला योग गुरू डॉ. अनिता पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी खाा. डॉ.उल्हास पाटील,उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ. केतकीताई पाटील, डॉ. वैभव पाटील, डॉ. अनिकेत पाटील, डॉ. अक्षता पाटील, डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर, प्रशासक अधिकारी राहुल गिरी,तसेच प्राध्यापकवर्ग, मार्गदर्शक प्रशिक्षक तसेच मित्रपरिवाराने जान्हवीचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. तिच्या या निवडीमुळे महाविद्यालयाचा नावलौकिक वाढला असून विद्यार्थीवर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.अखिल भारतीय स्तरावर होणार्या या स्पर्धेत जान्हवी दीपक सोमाणी उत्कृष्ट कामगिरी करून जळगाव व महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.