• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पारोळ्यात लग्नानंतर जेवणातून विष देऊन तिघांना मारण्याचा प्रयत्न; दोन महिला आरोपी अटकेत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 11, 2026
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पारोळ्यात लग्नानंतर जेवणातून विष देऊन तिघांना मारण्याचा प्रयत्न; दोन महिला आरोपी अटकेत

वेल्हाणे येथील घटना; धुळे जिल्ह्यातील निमगूळजवळ पोलिसांनी घेतले ताब्यात, मध्यस्थ एजंटचा शोध सुरू

पारोळा (प्रतिनिधी) : पारोळा तालुक्यातील वेल्हाणे येथे लग्नानंतर जेवणातून उंदीर मारण्याचे औषध देऊन तिघांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पारोळा पोलिसांनी दोन महिला आरोपींना धुळे जिल्ह्यातील निमगूळ गावापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर ताब्यात घेतले असून, संबंधित मध्यस्थ एजंटचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेल्हाणे येथील वाल्मिक ताराचंद पाटील (वय ३२) याचा विवाह ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सुमन सुभाष सहाणी हिच्यासोबत झाला होता. या विवाहासाठी झारखंड किंवा छत्तीसगड येथून दोन आदिवासी समाजातील महिलांना मध्यस्थ एजंटमार्फत आणण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या विवाहाच्या व्यवहारात अडीच लाख रुपयांची बोली ठरल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या व्यवहाराची आणि संबंधित एजंटची भूमिका पोलिस तपासातून स्पष्ट होणार आहे

दरम्यान, ९ ऑक्टोबर रोजी जेवणातून उंदीर मारण्याचे औषध देऊन फिर्यादी गणेश ताराचंद पाटील (वय ३४), त्यांचे वडील ताराचंद शांताराम पाटील आणि आई सरलाबाई यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर संबंधित महिला पैसे घेऊन निघून गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. विषबाधेमुळे त्रस्त झालेल्या फिर्यादीच्या आई-वडिलांना सध्या जळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती वेल्हाणे येथील पोलीस पाटलांनी पारोळा पोलिसांना ही माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. बिट अंमलदार पोलीस हवालदार सुनील हाटकर, पोलीस शिपाई गवळी आणि पोलीस शिपाई शिंदे यांना घटनास्थळी रवाना करण्यात आले. तपासादरम्यान दोन्ही महिला आरोपी धुळे जिल्ह्याच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने त्यांचा पाठलाग केला आणि गोपनीय माहितीच्या आधारे निमगूळ गावापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर दोन्ही महिलांना ताब्यात घेतले.

या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३८०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१), १२३, ३१६(२) आणि ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमन सुभाष सहाणी आणि आरती सूर्यप्रकाश पटेल अशी अटक करण्यात आलेल्या महिला आरोपींची नावे आहेत.

विवाहासाठी महिलांना आणणाऱ्या मध्यस्थ एजंटचा शोध पोलिसांकडून सुरू असून, या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास केला जात आहे. या घटनेतील सर्व बाबींचा तपास सुरू असून, आरोपींवरील आरोप न्यायालयीन प्रक्रियेत सिद्ध होणे बाकी आहे.


 

 

Previous Post

एरंडोलमध्ये अवैध सावकारीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पारोळ्यात लग्नानंतर जेवणातून विष देऊन तिघांना मारण्याचा प्रयत्न; दोन महिला आरोपी अटकेत
क्राईम

पारोळ्यात लग्नानंतर जेवणातून विष देऊन तिघांना मारण्याचा प्रयत्न; दोन महिला आरोपी अटकेत

October 11, 2026
एरंडोलमध्ये अवैध सावकारीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

एरंडोलमध्ये अवैध सावकारीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 9, 2026
रावेरच्या भगवती नगरात घरफोडी; सोन्याचे दागिने व रोकड लंपास
क्राईम

रावेरच्या भगवती नगरात घरफोडी; सोन्याचे दागिने व रोकड लंपास

October 9, 2026
भोकरखेडजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी
क्राईम

भोकरखेडजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

October 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पारोळ्यात लग्नानंतर जेवणातून विष देऊन तिघांना मारण्याचा प्रयत्न; दोन महिला आरोपी अटकेत

पारोळ्यात लग्नानंतर जेवणातून विष देऊन तिघांना मारण्याचा प्रयत्न; दोन महिला आरोपी अटकेत

October 11, 2026
एरंडोलमध्ये अवैध सावकारीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

एरंडोलमध्ये अवैध सावकारीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon