• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

फेसबुकवर संवाद साधून तुम्ही जनतेचं समाधान करू शकणार नाही – राधाकृष्ण विखे पाटील

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 9, 2021
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यात लसीच्या तुटवड्यावरून भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारवर परखड टीका केली आहे. “मंत्र्यांना सध्या मुख्यमंत्र्यांनी एकच काम दिलंय. केंद्रावर आरोप करा आणि आपलं पाप झाका. जनतेला वाऱ्यावर सोडल्याची भावना झाली आहे”, असं विखे पाटील म्हणाले

. “आता केंद्रावर बोट दाखवण्यापेक्षा रेमडेसिवीर, ऑक्सिजन उपलब्ध करा. प्रत्येक मंत्र्याला आपापल्या मतदारसंघात २०० बेडचं कोविड रुग्णालय उभारायला सांगा. फक्त फेसबुकवर संवाद साधून तुम्ही जनतेचं समाधान करू शकणार नाही”, असा टोला देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.
“इतक्या मोठ्या प्रमाणावर राज्याला व्हॅक्सिन मिळालं. पण त्याचं नियोजन राज्य सरकार करू शकलं नाही. तो नियोजनशून्य कारभार झाकण्यासाठी किंवा लोकांचं लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे. आपण केंद्राकडे बोट दाखवतोय. पण हजारो रुग्ण आज हॉस्पिटलमध्ये आहेत. हजारो रुग्णांना बेड मिळत नाहीयेत. नगरमध्ये रेमडेसिवीर मिळत नाहीयेत, आरोग्य सेवा उपलब्ध नाहीत”, असं ते म्हणाले.

काही दिवसांपासून राज्यात लसीच्या डोसचा तुटवडा निर्माण झाल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. त्यावरून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचं देखील चित्र असून राज्याला पुरेसे लसीचे डोस मिळावेत, अशी मागणी राज्य सरकारकडून केली जात आहे. दुसरीकडे केंद्र सरकारकडून पुरेसे लसीचे डोस दिले जात असल्याचा दावा केला जात आहे.

यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना खोचक टोला लगावला. “नगर जिल्ह्यात ४ मंत्री आहेत. इथले पालकमंत्री पाहुण्यासारखे येतात. त्यांच्या स्वत:च्या तालुक्यात ते एकही कोविड रुग्णालय सुरू करू शकलेले नाहीत. सगळं खासगी रुग्णालयांच्या भरवश्यावर सोडलंय. जिल्ह्यातले ३ -३ मंत्री करतात काय?”, असा सवाल विखे पाटील यांनी केला आहे.


 

 

Previous Post

युवा फाऊंडेशनतर्फे १५ गावात सॅनिटायझर व मास्कचे वाटप

Next Post

‘रेमडेसिवीर’चा मुंबईत काळा बाजार ; दोन जणांना अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

'रेमडेसिवीर'चा मुंबईत काळा बाजार ; दोन जणांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव बसस्थानकात ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणारे दोघे जेरबंद
1xbet russia

जळगाव बसस्थानकात ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणारे दोघे जेरबंद

May 6, 2026
घरफोडी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद
Uncategorized

घरफोडी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद

May 6, 2026
जळगावात ‘दामिनी पथक’ पुन्हा ॲक्शन मोडमध्ये; महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस अधीक्षकांचा मोठा निर्णय
1xbet russia

जळगावात ‘दामिनी पथक’ पुन्हा ॲक्शन मोडमध्ये; महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस अधीक्षकांचा मोठा निर्णय

May 6, 2026
प्रत्येकाच्या वैयक्तिक कौशल्याला संधी मिळण्यासाठी संघभावना महत्वाची
1xbet russia

प्रत्येकाच्या वैयक्तिक कौशल्याला संधी मिळण्यासाठी संघभावना महत्वाची

May 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव बसस्थानकात ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणारे दोघे जेरबंद

जळगाव बसस्थानकात ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणारे दोघे जेरबंद

May 6, 2026
घरफोडी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद

घरफोडी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद

May 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon