• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तात्यासाहेब रमेश पाटील यांच्या स्मरणार्थ पितृस्मृती प्रवेशद्वाराची तपपूर्ती

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 8, 2020
in जळगाव
0

चाळीसगाव (प्रतिनिधी) – येथून जवळच असलेल्या कुंझर तालुका चाळीसगाव येथील ज्ञानमंदिर व देवालयाला आदर्श शिक्षक तात्यासाहेब रमेश सहादू पाटील यांच्या स्मरणार्थ मुख्य प्रवेशद्वार पितृस्मरणार्थ बांधून लोकार्पण करण्याच्या कुंझर येथील रहिवाशी आणि राज्य सरकारच्या आदर्श शिक्षक पुरस्कार मानकरी आदर्श शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांच्या प्रेरणादायी उपक्रमाला या पितृपक्षपंधरवाड्यात बारा वर्षे पूर्ण झाले आहेत.

सध्या पितृपक्ष पंधरवडा सुरू असून तपपूर्ती झाल्याने गावाच्या सहकार्याने हे प्रेरणादायी कार्य करणारे कुंझर येथील रहिवासी जिल्हा परिषद शाळा टिकवा अभियान राज्यभर राबवणारे तसेच स्वतःच्या दोन्ही मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल करून राज्यात सर्वप्रथम स्वच्छेने सेमी इंग्रजी माध्यमाची जिल्हा परिषद शाळेत सुरुवात करणारे तसेच बैलपोळा व विविध धार्मिक सण उत्सवातून जिल्ह्यात राज्यात बेटी बचाव बेटी पढाव शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नकाचा जागर ग्रामीण भागात घरोघरी करणारे राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त तसेच जिल्हा परिषद जळगावचे आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी राज्यातील शिक्षकांना उपक्रमासाठी स्वतः पुढाकार घेत शक्य तेवढी प्रेरणा देणारे प्रेरणादायी आदर्श व्यक्तिमत्व किशोर पाटील कुंझरकर यांचे राज्य शासनाच्या थॅंक्स टीचर मोहिमेअंतर्गत जिल्हा परिषद शाळा कुंझर तसेच गावाच्यावतीने कौतुक होत आहे. दिवंगत वडील व सर्वप्रथम त्यांच्या वर्गात स्वतः शिक्षण घेतल असे आदर्श शिक्षक स्वर्गीय कैलास वासी तात्यासाहेब रमेश सहादु पाटील यांच्या स्मरणार्थ कुंझर येथील ज्ञानालय व देवालय असा संगम असलेल्या कुंझर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व श्री. निळकंठेश्वर महाराज यांच्या आवाराला मुख्य प्रवेशद्वारावर पितृस्मरणार्थ भव्य प्रवेशद्वार सन २००८ यावर्षी गावाच्या मान्यतेने व सर्वांच्या एक मुखी इच्छेखातर बांधून दिले आहे आणि तालुक्यातील सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते प्रेरणादायी वडिलांच्या स्मृती कायम स्मरणात राहाव्यात यासाठी गावाच्या वतीने दिवंगत वडील आदर्श शिक्षक तात्यासाहेब रमेश सहादु पाटील यांच्या सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा प्रेरणादायी व सर्वांना हवाहवासा स्वभाव पाहता वडिलांचे निधन झाल्यावर २००८ साली आजपासून बारा वर्षापूर्वी गावातील सर्व नागरिकांच्या व सर्व पदाधिकाऱ्यांच्या सर्व पक्ष पदाधिकाऱ्यांच्या आलेल्या एक मुखी आलेल्या मागणीला साद घालत वडिलांचा सुपुत्र तसेच विद्यार्थी या नात्याने तसेच शिक्षक या नात्याने साथ देत स्वखर्चाने पदरमोड स्वतः करून आपल्या गावच्या ज्या मातीत आपण वाढलो त्या मातीतल्या शाळेला व मंदिराला मुख्य स्मृती प्रवेशद्वार पितृ स्मरणार्थ बांधून या अवलिया शिक्षकाने गावापुढे व समाजापुढे प्रेरणादायी आदर्श उभा केला. सन 2017 18 मध्ये राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर गावाने त्यांची घोड्यावरून मिरवणूक काढून कुंझर भूषण सन्मान देऊन आजी माजी आमदार खासदार जिल्हा परिषदचे पदाधिकारी प्रशासनातील अधिकारी यांच्या उपस्थितीत गौरविले होते. तत्पूर्वी आपल्या पितृ स्मरणार्थ बारा वर्षापूर्वी आजी माजी खासदार व शिक्षक संघटनेच्या राज्यस्तरीय नेत्यांच्या व सर्व गावकऱ्यांचे उपस्थित या प्रेरणादायी स्मृती प्रवेशद्वाराचे त्यावेळी बारा वर्षापूर्वी लोकार्पणर्पण झाले. मान्यवरांच्या शुभहस्ते तत्कालीन खासदार वसंतरावजी मोरे,राज्याचे शिक्षक नेते स्वर्गीय हनुमंतराव पवार साहेब, इसाक जी पटेल, ग्रामपंचायतचे सर्व आजी-माजी सरपंच गावातील सर्व नागरिक ग्रामस्थ यांच्या व युवकांच्या उपस्थित या आदर्श शिक्षकाच्या स्मृती जिवंत ठेवणाऱ्या आणि ज्ञानमंदिर व देवालय यासाठी उभारलेल्या पितृस्मृती प्रवेशद्वाराचे भव्य असा कार्यक्रम घेऊन २००८ साली लोकार्पण सोहळा गावाच्या सर्व मान्यवर व गावकऱ्यांच्या तसेच जिल्ह्यातील शैक्षणिक सामाजिक चळवळीतील समाजसेवक व नातेवाईकांच्या सहभागाने करण्यात आले. जिल्हा परिषद शाळा टिकल्या पाहिजेत यासाठी राज्यात सर्वांनी सर्वत्र आपल्या शाळेला जीव लावावा व शाळेच्या विकासासाठी पुढाकार घ्यावा तसेच ज्ञानालय व देवालय या दोन्ही मंदिरातून भावी पिढीसाठी सुसंस्कार मिळतात हा निकोप हेतू ठेवत जिल्हापरिषदेच्या एखाद्या शिक्षकाने आपल्या वडिलांसाठी त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आपल्या गावच्या शाळेला बांधून दिलेला प्रवेशद्वाराचा चाळीसगाव तालुक्यातील कुंझर येथून झालेला २००८ साली म्हणजे आजपासून १२ वर्षापूर्वीचा हा शैक्षणिक क्षेत्रातील अनोखा आदर्श व प्रेरणादायी पहिलाच प्रयोग होता आणि तो अनुकरणीय असल्याने पितृपंधरवड्यात सर्वत्र या उपक्रमाचे स्वागत दरवर्षी होते. मागील बारा वर्षापासून किशोर पाटील कुंझरकर यांचा संपूर्ण परिवार, तसेच तत्कालीन तात्यासाहेब रमेश सहादू पाटील हयात असतानाच मागील साठ वर्षापासून देखील त्यांचा संपूर्ण परिवार गावातील सर्व संस्थांच्या राजकारणापासून संपूर्णता अलिप्त आणि सर्वांच्या सुखदुःखात पुढाकार घेत धावून येणारा सामाजिक बांधिलकी जोपासणारा असा आदर्श परिवार म्हणून ओळखला जात होता. व आजही या परिवाराची तीच ख्याती गावात व जिल्ह्यात आहे .गावातील सर्व नागरिक सर्वपक्षीय सर्वधर्मीय सर्व जातीय लोक हे आपले कुटुंब आहे असे समजून सर्वांपासून समान अंतरावर असलेलं आणि सर्वांना जीव लावणार सर्वांना आपलं म्हणणार आपला गाव हाच आपला स्वाभिमान आहे हे सातत्याने दर्शवणारं हे अनोखं व आदर्श कुटुंब आहे. ते गावातील कुठल्याच राजकारणात कोणाकडूनही कधीच सहभाग घेत नाहीत.मात्र गावाचे नाव पुढे जावे यासाठी आपापल्या क्षेत्रात सातत्याने वेगवेगळ्या प्रयोगातून गावाचे नाव पुढे नेण्यासाठी आपल्या नावातच आपल्या गावाचे नाव लावून किशोर पाटील यांनी विद्यार्थिदशेपासून तर आज पावेतो त्यांनी गावाविषयीची आत्मीयता व मातृभूमी विषयीचा जिव्हाळा सिद्ध केला आहे. पितृपंधरवड्यात यंदा स्मृती प्रवेशद्वाराला बारा वर्षे एक तप पूर्ण झाल्याने सर्वत्र त्याचे स्वागत होत आहे. राज्यातील शिक्षण विभागाच्या राजपत्रित अधिकारी केंद्रप्रमुख संघटना पदवीधर संघटना विविध शिक्षक संघटना शिक्षक संघटनांच्या राज्य अध्यक्ष यांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या राज्य समन्वय समितीचे बिनविरोध राज्य महासचिवपदी या धडपडी शिक्षकाची निवड झाली आहे. कोरोणा काळात त्यांनी प्रत्यक्ष आदिवासी वाडी-वस्तीवर जात स्वच्छेने राबविलेला आदिवासी वस्तीवरील घरघर शाळा शिक्षण आपल्या दारी हा उपक्रम तसेच स्वतःच्या दोन्ही मुलांना जिल्हा परिषद शाळेत दाखल करण्याचा उपक्रम सर्वत्र अनुकरणीय ठरला असून शालेय शिक्षण विभागाने कौतुकास्पद उपक्रम म्हणून नोंद घेतली आहे. अशा या झपाटलेल्या ध्येयवेड्या शिक्षकाचे पितृपक्ष पंधरवडा आणि सध्या सुरू असलेल्या थॅंक्स टीचर मोहीम निमित्त आजी माजी सरपंच, ग्रामस्थ सर्वपक्षीय पदाधिकारी युवकांकडून आणि ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक यांच्यावतीने कौतुक आणि अभिनंदन होत आहे.


 

 

Previous Post

ग्रामीण भागातही आता गॅस सिलिंडर नि:शुल्क घरपोच – विकास महाजन

Next Post

ठाकरे सरकारची मोठी घोषणा : वैद्यकीय प्रवेशातील 70:30 कोटा पद्धत रद्द

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

ठाकरे सरकारची मोठी घोषणा : वैद्यकीय प्रवेशातील 70:30 कोटा पद्धत रद्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या कार्यकारिणीचा पदग्रहण व सत्कार सोहळा उत्साहात
1xbet russia

महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या कार्यकारिणीचा पदग्रहण व सत्कार सोहळा उत्साहात

July 24, 2026
विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्ती प्रक्रिया १० दिवसांत पूर्ण करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्ती प्रक्रिया १० दिवसांत पूर्ण करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 24, 2026
मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर’
1xbet russia

लोकमान्य टिळक आणि क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांना डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात अभिवादन

July 24, 2026
सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलची सुवर्ण कामगिरी
1xbet russia

सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलची सुवर्ण कामगिरी

July 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या कार्यकारिणीचा पदग्रहण व सत्कार सोहळा उत्साहात

महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या कार्यकारिणीचा पदग्रहण व सत्कार सोहळा उत्साहात

July 24, 2026
विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्ती प्रक्रिया १० दिवसांत पूर्ण करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्ती प्रक्रिया १० दिवसांत पूर्ण करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon