• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भुसावळ येथील कारागृहाचा प्रश्न मार्गी लावणार ; पालकमंत्री गुलाबराव पाटील

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 5, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – येथील जिल्हा कारागृहातील वाढती बंदी संख्या लक्षात घेता भुसावळ येथे दर्जा 1 चे जिल्हा कारागृह होण्यासाठी प्रयत्नशील करणार असल्याची माहिती राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

जळगांव जिल्हा कारागृह येथून गेल्या महिन्यात कैद्यांनी केलेल्या पलायनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी जिल्हा कारागृहास अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हा कारागृह अधिकारी पी. जे. गायकवाड, वरिष्ठ तुरुंग अधिकारी जितेंद्र माळी उपस्थित होते. याप्रसंगी कारागृहात कैद्यांना द्यावयाच्या विविध सोयी सुविधा, मागील संरक्षक भिंतीची उंची वाढवणे, कारागृह परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे या व अन्य अत्यावश्यक सुविधांसह कारागृहातील कोविड पॉझिटिव्ह कैद्यांसाठी स्वतंत्र वैद्यकीय तपासणी व उपचार खोली उपलब्ध करून जिल्हा कारागृहात आवश्यक त्या दुरुस्त्या करण्यासाठी निधी मागणीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागास व जिल्हा कारागृह प्रशासनास दिल्या. त्याचबरोबर कारागृहातील स्वच्छता, शिस्त याबाबत पालकमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांनी स्वखर्चाने कैद्यांच्या रोजच्या स्वयंपाकासाठी अत्यावश्यक भांडी जिल्हा कारागृहाला भेट दिली.

जिल्हा कारागृहाची स्थापनेवेळी (58 वर्षापूर्वी) असलेली अधिकृत बंदी संख्या ही 200 होती. आता याठिकाणची बंदी संख्या वाढली आहे. क्षमतेच्या दुपटीपेक्षा अधिक म्हणजे 442 बंदी सध्या कारागृहात दाखल असल्याने त्यांना पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रशासनावर मोठ्या प्रमाणात ताण पडत आहे. सद्य:स्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव कारागृहात होऊ नये तसेच जळगाव कारागृहातील बंदी संख्या कमी करणे अत्यंत आवश्यक आहे. जळगाव जिल्हा कारागृह येथे नवीन बांधकाम करण्यास अतिरिक्त जागा उपलब्ध नाही. भुसावळ येथे 20 एकर जागा उपलब्ध असून तेथे जिल्हा कारागृह वर्ग 1 नव्याने निर्माण करणेबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आलेला असून लवकरच भुसावळ येथे हे नवीन कारागृहाच्या मंजूरीसाठी मी स्वत: प्रयत्नशील राहणार असल्याचेही पालकमंत्री यांनी सांगितले.

याप्रसंगी माजी महापौर तथा नगरसेवक विष्णू भंगाळे, पं. स. सभापती नंदलाल पाटील, रवी चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता सुभाष राऊत, प्रशांत सुरळकर, माळी आदि उपस्थित होते.


 

 

Previous Post

लॉकडाऊनच्या काळात नियमांचे उल्लंघन ; जळगाव जिल्ह्यात 30 लाख 51 हजार रुपयांचा दंड वसूल

Next Post

जळगाव मनसेतर्फे कंगना व राम कदम यांचा निषेध

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगाव मनसेतर्फे कंगना व राम कदम यांचा निषेध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरचे प्रा. अनिल पाटील अपघातात ठार
1xbet russia

अमळनेरचे प्रा. अनिल पाटील अपघातात ठार

June 14, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

चांदसणीत घरफोडी; ७२ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास

June 14, 2026
जळगावात गोल्ड लोन सोडवून दागिने देण्याचे आमिष; सराफा व्यावसायिकाची १८ लाखांची फसवणूक
1xbet russia

जळगावात गोल्ड लोन सोडवून दागिने देण्याचे आमिष; सराफा व्यावसायिकाची १८ लाखांची फसवणूक

June 14, 2026
पाचोरा तालुक्यात बनावट पार्सलच्या बहाण्याने घरात घुसून दरोडा
1xbet russia

पाचोरा तालुक्यात बनावट पार्सलच्या बहाण्याने घरात घुसून दरोडा

June 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अमळनेरचे प्रा. अनिल पाटील अपघातात ठार

अमळनेरचे प्रा. अनिल पाटील अपघातात ठार

June 14, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला

चांदसणीत घरफोडी; ७२ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास

June 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon