• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आचारसंहितेचा विसर, ‘कमळा’चे चिन्ह असलेले मास्क परिधान करून भाजपा उमेदवार पोहोचले मतदान केंद्रावर!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 28, 2020
in महाराष्ट्र
0

पटना (वृत्तसंस्था) – बिहारमधील विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील ७१ जागांसाठी आज बिहारमधील लोक आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. या टप्प्यात अनेक बड्या मंत्र्यांचे आणि नेत्यांचे भवितव्य आज मतदान पेटीत बंद होणार आहे. दरम्यान, भाजपाचे उमेदवार आणि नितीश सरकारमधील मंत्री. डॉ प्रेम कुमार आपल्या पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेल्या कमळाच्या चित्राचा मास्क परिधान करत मतदान केंद्रावर दाखल झाले. यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.

भाजपाचे उमेदवार प्रेम कुमार यांच्या गया शहर मतदारसंघातही आज मतदान होत आहे. प्रेम कुमार सकाळी मतदान करण्यासाठी देण्यासाठी बाहेर गेले. प्रेम कुमार हे ज्येष्ठ नेते आहेत, परंतु ते मतदान करण्यासाठी सायकलवरून मतदान केंद्रावर पोहोचले. त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. यावेळी प्रेम कुमार यांनी परिधान केलेल्या मास्कवर भाजपाचे निवडणूक चिन्ह असलेल्या कमळाचे चित्र होते. तेच मास्क परिधान करून प्रेम कुमार मतदान केंद्रावर पोहोचले होते.

कमळ चिन्ह असलेले मास्क परिधान केल्यामुळे प्रेम कुमार यांच्यावर निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावर प्रेम कुमार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, “मास्क परिधान करणे आवश्यक असल्यामुळे वापरले. ज्या मास्कचा आम्ही वापर करत होतो, त्याचाच वापर इथेही झाला. मतदान केंद्राच्या ठिकाणी दुसऱ्या मास्कची व्यवस्था नव्हती. त्यामुळे माझ्याजवळ जे मास्क होते, तेच वापरून मी गेलो. मी काही हे जाणून बुजून केले नाही. फक्त सुरक्षेच्या कारणास्तव हे मास्क परिधान केले होते”

दरम्यान, कोरोनाच्या पाश्वर्भूमीवर निवडणूक आयोगाने दिशानिर्देश आधीच जारी केलेले आहेत. या निर्देशानुसार, कोरोना क्वारंटाईन मतदारांना शेवटच्या तासात मतदानाची सुविधा दिली जाईल. तसेच मास्क, सॅनिटायझर, ग्लोव्हज यांचा वापर करणे आवश्यक असेल. मतदानासाठी एक तासाची वेळ वाढवून देण्यात आली आहे. ७.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. या निवडणुकीसाठी ७ लाख हँड सॅनिटायझर, ४६ लाख हून अधिक मास्क, ६ लाक पीपीई कीटस, ७.६ लाख बोडशीट, २३ लाख हँड ग्लोव्ह्ज यांची तयारी करण्यात आली आहे.

बिहार विधानसभा निवडणूक २०२० साठी होणाऱ्या मतदानाच्या पहिल्या टप्प्यात १६ जिल्ह्यातील ७१ मतदारसंघात मतदान समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात १७ जिल्ह्यातील ९४ मतदारसंघांचा तर तिसऱ्या टप्प्यात १५ जिल्ह्यातील ७८ मतदारसंघांचा समावेश आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी अनुक्रमे १९ ऑक्टोबर आणि ७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीचा निकाल १० नोव्हेंबर रोजी जाहीर होईल.


 

 

Previous Post

कांदा आयातीमुळे दर आणखी घसरण्याची चिन्हे

Next Post

राष्ट्रीय आरोग्य मिशनमध्ये ४०० कोटींचा गैरव्यवहार; फडणवीसांकडून चौकशीची मागणी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

राष्ट्रीय आरोग्य मिशनमध्ये ४०० कोटींचा गैरव्यवहार; फडणवीसांकडून चौकशीची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील
Uncategorized

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून
1xbet russia

बँकेचे सील तोडून जप्त घरात घुसखोरी; दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

July 28, 2026
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल
1xbet russia

क्रिकेट खेळण्याच्या वादातून दहा जणांचा धुडगूस; एकास मारहाण, जीवे मारण्याची धमकी

July 28, 2026
भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास
1xbet russia

भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास

July 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

बँकेचे सील तोडून जप्त घरात घुसखोरी; दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

July 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon