• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

“मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात पुरावा नष्ट करण्यासाठी डायटोम टेस्ट करण्यात आली का?”, आशिष शेलारांचा सवाल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 26, 2021
in जळगाव
0

मुंबई (वृत्तसंस्था) – मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावरून भाजपचे नेते आशिष शेलार यांनी गंभीर आरोप केले आहेत. हिरेन यांचा पोस्टमार्टमच्या अहवालात त्यांच्या तोंडात कोंबलेल्या रुमालाचा उल्लेखच नाहीये. हा उल्लेख का केला नाही? हे रुमाल कुणी पळवले आहे? तसेच याप्रकरणातील पुरावा नष्ट करण्यासाठी डायटोम टेस्ट करण्यात आली का?, असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे.

आशिष शेलार यांनी आज (२६ मार्च) पत्रकार परिषद घेऊन मनसुख हिरेन प्रकरणी अनेक सवाल उपस्थित केले. गेल्या काही दिवसात जे काही राज्यात सुरू आहे, त्याची उत्तरे राज्य सरकारला द्यावी लागतील. मनसुख हिरेन प्रकरण एनआयएकडे जाऊ नये असाच राज्य सरकारचा प्रयत्न होता. मात्र ठाणे कोर्टाने निर्णय दिल्यानंतर एनआयएकडे हा तपास देण्यात आला. एटीएसला हा तपास आपल्याकडेच ठेवायचा होता. त्यामागे पुरावे नष्ट करणे आणि चौकशीची दिशा भरकटवण्याचा त्यामागे कुहेतू होता का? असा सवाल शेलार यांनी केला आहे.

हिरेन यांचा मृतदेह मिळाला तेव्हा त्यांच्या तोंडावर रुमालाच्या पट्ट्या होत्या. माझ्याकडे शवविच्छेदन अहवाल आहे. फॉरेन्सिकला जाण्याआधीच्या रिपोर्टमध्ये या रुमालाच उल्लेख नाही. रुमाल हा या प्रकरणातील ठोस पुरावा आहे. त्याचाच उल्लेख अहवालात नाही. मग हे रुमाल कुणी पळवले? पोलिसांनीच जाणीवपूर्वक या रुमालांचा उल्लेख टाळला का? असा सवालही त्यांनी केला.

शवविच्छेदन करताना व्हिडिओ रेकॉर्डिंग करणं अपेक्षित आहे. ५ मार्च २०२१ला दोन तास मनसुखचं पोस्टमार्टेम सुरू होतं. पण 1 मिनिटाच्या 7 रेकॉर्डिंग करण्यात आल्या. या व्हिडिओ रेकॉर्डिंग जोडल्या तर हा प्रकार कुणाच्या सांगण्यावरून केला. कोणत्या मंत्र्यांच्या सांगण्यावरून करण्यात आलं हे समोर येण्याची आवश्यकता आहे, असं ते म्हणाले.

एखाद्याच बुडून मृत्यू झाला तर त्याची डायटोम टेस्ट आवश्यक असते, असं सरकारी वकील म्हणतात. आरोपीच्या लंग्स आणि शरीरात पाणी सापडलं नाही. मग डायटोम टेस्ट का केली. पुरावा नष्ट करण्यासाठी डायटोम टेस्ट करण्यात आली, असं ते म्हणाले. आमची लॅब नोंदणीकृत नसल्याचं कलिना लॅबने सांगितलं. मग जेजे रुग्णालयातील लॅबमध्ये पोलीस गेले. परंतु जेजेची लॅबही नोंदणीकृत नव्हती. मग त्यांनी टेस्ट का केली. ही स्क्रिनिंग टेस्ट असल्याचं जेजेने सांगितलं आहे. पण अंतिम टेस्ट हरियाणामध्ये होईल असं सांगण्यात आलं. डायटोम टेस्ट नाही आणि रुमालही नाही हे एटीएसच्या लक्षात आलं होतं, असंही ते म्हणाले.


 

 

Previous Post

मुंबईतील भांडूपमधील कोरोना रुग्णालयाला आग, 10 जणांचा मृत्यू

Next Post

चिलगाव आणि पाळधी येथील दारू अड्डावर धाड ; तीन जणांविरूध्द गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

चिलगाव आणि पाळधी येथील दारू अड्डावर धाड ; तीन जणांविरूध्द गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव शहरात मुसळधार पाऊस : महापौर दीपमाला काळे पहाटेपासूनच रस्त्यावर..!
Uncategorized

जळगाव शहरात मुसळधार पाऊस : महापौर दीपमाला काळे पहाटेपासूनच रस्त्यावर..!

July 31, 2026
मुसळधार पावसामुळे वड्री व निंबा देवी धरणांमध्ये जलसाठा वाढला; मनू देवी धबधबा प्रवाहित
Uncategorized

मुसळधार पावसामुळे वड्री व निंबा देवी धरणांमध्ये जलसाठा वाढला; मनू देवी धबधबा प्रवाहित

July 31, 2026
उसनवारीचे पैसे मागितल्यावरून तरूणाला तिघांकडून बेदम मारहाण
Uncategorized

जनावरांनी मका खाल्ल्याच्या कारणावरून दोन गटांत हाणामारी; पाच जणांविरुद्ध गुन्हा

July 31, 2026
दोन अल्पवयीन बहिणी बेपत्ता; अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा
क्राईम

दोन अल्पवयीन बहिणी बेपत्ता; अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा

July 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव शहरात मुसळधार पाऊस : महापौर दीपमाला काळे पहाटेपासूनच रस्त्यावर..!

जळगाव शहरात मुसळधार पाऊस : महापौर दीपमाला काळे पहाटेपासूनच रस्त्यावर..!

July 31, 2026
मुसळधार पावसामुळे वड्री व निंबा देवी धरणांमध्ये जलसाठा वाढला; मनू देवी धबधबा प्रवाहित

मुसळधार पावसामुळे वड्री व निंबा देवी धरणांमध्ये जलसाठा वाढला; मनू देवी धबधबा प्रवाहित

July 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon