• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

लोक त्यांना मूर्खात काढतात हे समजलं पाहिजे – संजय राऊत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 25, 2021
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्या अनिल देशमुखांवर आरोप करणाऱ्या पत्राच्या चौकशी आधी कारवाई व्हावी असा जोर फडणवीस का लावत आहेत असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे

परमबीर सिंह यांनी खरंच ते पत्र लिहिलं आहे का असा प्रश्न निर्माण होतो की त्यांना कोणीतरी लिहून दिलं आणि त्यांनी सही केली असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राचा उल्लेख करत अनिल देशमुख पहिल्या दिवसापासून चौकशी करा असं सांगत आहेत असं म्हटलं. “चौकशीला कोणाचाही नकार नव्हता. मुख्यमंत्री, अनिल देशमुख, आम्ही चौकशी करा म्हणत होतो, फक्त विरोधी पक्षनेते म्हणतात चौकशी नको आधी फाशी द्या,” अशी टीका त्यांनी केली. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.

“चौकशीआधी फाशी त्यांच्या राजवटीत किती लोकांना दिली हा तपशील त्यांनी जाहीर केला पाहिजे. विरोधी पक्षनेते मोदींपेक्षा मोठे नेते असावेत, त्यामुळे त्यांना हे सांगण्याचा अधिकार आहे. त्यांच्या मोठेपणाची उंची सह्याद्रीपेक्षा मोठी आहे, त्यामुळे ते मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत आणि विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारीही नीट सांभाळू शकले नाहीत. विरोधी पक्षनेत्याने त्या पदाची प्रतिष्ठा नष्ट होईल, कमी होईल असं वर्तन करु नये. शेवटी देशातील शोषित, पीडितांचा आवाज विरोधी पक्षनेता असतो, सरकार नसतं याचं भान प्रत्येत विरोधी पक्षनेत्याने ठेवलं पाहिजे,” अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

“वारंवार राजीनाम्याची आणि सरकार बरखास्त करण्याची मागणी यामुळे विरोधी पक्षाचं हसू होतं, लोक त्यांना मूर्खात काढतात हे समजलं पाहिजे. आमच्यासाठी हा विषय संपला असून यावर आता जास्त चर्चा होता कामा नये. यामध्ये विशेष घडामोडी घडतील असं वाटत नाही,” असं संजय राऊत यांनी यावेळी म्हटलं.

“राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची यादी पाठवून सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला. त्याबद्दल काय झालं याचा खुलासा होणं गरजेचं आहे. अभ्यास करत आहेत वैगेरे ठीक आहे, त्यातून त्यांना काही पीएचडी करायची आहे का? जी नावं पाठवली आहेत ती जास्तीत जास्त काळ आपल्या मांडीखाली कशी दाबून ठेवता येतील यासंदर्भात एखादा गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड करायचा आहे का असा प्रश्न आहे,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

“काँग्रेसमध्ये नाराजी वैगेरे काही नाही. किंबहुना काँग्रेस पक्षातूनच अशा सूचना येत आहेत. युपीए अधिक मजबूत होण्यासाठी ही काँग्रेस पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांची भूमिका आहे. सोनिय गांधीचीही तशी भूमिका असू शकते. सोनिया गांधींनी प्रदीर्घ काळ युपीएचं नेतृत्व खंबीरपणे केलं आहे, पण सध्या त्यांची प्रकृती चांगली नसते. देशात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत अशावेळी युपीएचं नेतृत्व काँग्रेसबाहेरील नेत्याने करावं ही अनेक राज्यांमधील प्रादेशिक पक्षांची मागणी आहे. आज युपीए अत्यंत विकलांग अवस्थेत आहे,” असं संजय राऊत यांनी यावेळी म्हटलं.


 

 

Previous Post

ना. नितिन गडकरींनी दिली अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्यमार्गाला तत्त्वतः मान्यता

Next Post

संजय राऊतांच्या या वक्तव्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही – हुसेन दलवाई

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

संजय राऊतांच्या या वक्तव्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही - हुसेन दलवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाहेर जाऊन विषप्राशन करीत आला घरी, उपचारादरम्यान तरुणाचे निधन !
1xbet russia

विष प्राशन केल्याने २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

May 4, 2026
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

चांदणी कुऱ्हेच्या तरुणाचा गळफास घेऊन आत्महत्या

May 4, 2026
ग्वालियर आयडीई बुटकॅम्प मध्ये गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय विद्यार्थ्यांचे यश
1xbet russia

ग्वालियर आयडीई बुटकॅम्प मध्ये गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय विद्यार्थ्यांचे यश

May 4, 2026
पांढरा काविळ असलेल्या दोन रुग्णांवर शिबिरातून मोफत मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

पांढरा काविळ असलेल्या दोन रुग्णांवर शिबिरातून मोफत मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया

May 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बाहेर जाऊन विषप्राशन करीत आला घरी, उपचारादरम्यान तरुणाचे निधन !

विष प्राशन केल्याने २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

May 4, 2026
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

चांदणी कुऱ्हेच्या तरुणाचा गळफास घेऊन आत्महत्या

May 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon