जळगाव ( प्रतिनिधी ) — जिल्हा रूग्णालयाकडून प्राप्त अहवालानुसार आज दिवसभरात एकही रूग्ण आढळला नाही. दोन रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
जळगाव जिल्ह्यात आज एकही कोरोना बाधित रूग्ण आढळून आलेला नाही. दोन रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४२ हजार ७३१ बाधित रूग्ण आढळून आले आहे त्यापैकी १ लाख ४० हजार १३८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. २ हजार ५७५ रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आता जिल्ह्यात १८ बाधित रूग्ण असून विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.