• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

केंद्राकडून देशातील लसीकरणासंबंधी नियमावली जाहीर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 15, 2021
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशात उद्यापासून लसीकरणाची मोहिम सुरू होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन होणार आहे. याआधी केंद्र सरकारकडून राज्यांना लसीकरणासंबंधी नियमावली पाठवण्यात आली आहे. या नियमावलीत लसीकरणादरम्यान कोणत्या गोष्टी करायच्या आहेत आणि कोणत्या नाही याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.

करोनायोद्धय़ांना सर्वात अगोदर लसीचा लाभ मिळणार असून, त्यापैकी काही जणांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे संवादही साधणार आहेत. लसीकरण मोहिमेच्या प्रारंभावेळी लशींचा पुरवठा आणि वितरणावर देखरेख ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘को-विन’ अ‍ॅपचे लोकार्पणही पंतप्रधानांच्या हस्ते होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

आरोग्य क्षेत्रातील जवळपास तीन कोटी कर्मचाऱ्यांना २९३४ केंद्रांवर लस टोचण्यात येणार आहे. एका केंद्रावर दररोज एका सत्रात १०० जणांचे लसीकरण करण्याची सूचना राज्यांना देण्यात आली आहे. लसीकरणादरम्यान काही मात्रा वाया जाण्याची शक्यता गृहीत धरून प्रति १०० कुप्यांमागे दहा कुप्या राखीव ठेवण्यात येणार आहेत. लसीकरणासाठी वयोमर्यादा आखण्यात आलेली असून १८ पेक्षा जास्त वय असलेल्यांनाच यामध्ये सहभागी करुन घेण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय गरोदर माता किंवा ज्यांना गरोदरपणाबद्दल नक्की माहिती नाही तसेच स्तनपान करणाऱ्या मातांचे लसीकरण करु नये असे केंद्राकडून सांगण्यात आले आहे.

केंद्र सरकारने यावेळी लसची अदलाबदल केली जाऊ नये असे स्पष्ट सांगितले आहे. पहिला डोस ज्या लसीचा देण्यात आला होता त्याच लसीचा डोस दुसऱ्या वेळी दिला जावा असे केंद्राने नमूद केले आहे. औषध नियामकाने कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसींच्या वापराला परवानगी दिली असून २८ दिवसांच्या अंतराने दोन डोस घ्यावे लागणार आहेत.

ज्यांना करोनाची लागण झाली होती त्यांच्यासाठी प्रोटोकॉल पाळावा लागणार आहे. करोनाची लक्षणे असणाऱ्यांचे, प्लाझ्मा थेरपी झालेल्यांचे तसेच इतर कारणांमुळे रुग्णालयात दाखल असणाऱ्यांचे लसीकरण चार ते आठ आठवड्यांसाठी स्थगित करावे लागणार आहे. देशात शनिवारपासून सुरू होणारी ही जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम असेल. त्यामुळे आरोग्य मंत्रालयाने राष्ट्रपतींच्या कार्यालयाशी सल्लामसलत करून पोलिओ लसीकरणाच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला असून, पोलिओ लसीकरण ३१ जानेवारीला असेल, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.


 

 

Previous Post

धनंजय मुंडे यांचा तूर्तास राजीनामा घेतला जाणार नाही- राष्ट्रवादी काँग्रेस

Next Post

धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा – अँड. प्रकाश आंबेडकर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा - अँड. प्रकाश आंबेडकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पक्ष वेगवेगळे असले तरी विकास आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सशक्त प्रतिनिधित्वासाठी सर्वांची भावना एकच – अनिल चौधरी
1xbet russia

पक्ष वेगवेगळे असले तरी विकास आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सशक्त प्रतिनिधित्वासाठी सर्वांची भावना एकच – अनिल चौधरी

June 13, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

विहिरीतील दगड उचलण्याच्या वादातून ७५ वर्षीय वृद्धासह पत्नीला लाठीकाठीने बेदम मारहाण

June 12, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
1xbet russia

घरासमोर बांधलेल्या तीन बकऱ्यांची चोरी; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 12, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

थरार: जावयाला जखमी करत विवाहितेचे ‘स्कॉर्पिओ’तून अपहरण

June 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पक्ष वेगवेगळे असले तरी विकास आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सशक्त प्रतिनिधित्वासाठी सर्वांची भावना एकच – अनिल चौधरी

पक्ष वेगवेगळे असले तरी विकास आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सशक्त प्रतिनिधित्वासाठी सर्वांची भावना एकच – अनिल चौधरी

June 13, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल

विहिरीतील दगड उचलण्याच्या वादातून ७५ वर्षीय वृद्धासह पत्नीला लाठीकाठीने बेदम मारहाण

June 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon