कोल्हापूर (वृत्तसंस्था) – मुंबई ,नवी मुंबई, पुणे- हिंजवडी प्रमाण कोल्हापुरात भव्य आयटी पार्कची निर्मिती करणार असल्याची घोषणा राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी कोल्हापुरात केली आहे. यासंदर्भात उद्योजकांची आज मुंबईत बैठक होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कोल्हापुरात एक मोठा उद्योग यावा यासाठी गेल्या कित्येक महिन्यांपासून आमचे प्रयत्न सुरू होते त्या प्रयत्नांना आता यश येताना पाहायला मिळत आहे. त्यामुळेच मुंबई पुण्याच्या धर्तीवर ती कोल्हापुरात मोठे आयटी पार्क उभारले जाणार असून त्यांन शंभर एकर जागेची उपलब्धता करून देण्यासाठी अनेक जण पुढे आल्याच देसाई यांनी म्हटल आहे.
या आयटी पार्क मूळ अनेक तरुणांना रोजगार मिळणार असून कोल्हापुरच्या विकासाला गती मिळणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले आहे. याचबरोबर अनेक उद्योग कोल्हापुरात कसे येतील यासाठी आपण विशेष प्रयत्न करत असून त्यासंदर्भात अनेकांशी बोलणं देखील सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे तसेच यासंदर्भात लवकरच करार सुद्धा होतील असे देखील त्यांनी म्हटले आहे.