नौजवान भारत विद्यार्थी संघटनेचे निवेदन
जळगाव (प्रतिनिधी) :- नौजवान भारत विद्यार्थी संघटनेने युवारंगचे प्रमुख संयोजक प्रा. जुगल किशोर दुबे,राजू नन्नवरे यांना युवारंग मध्ये धुडगूस घालणाऱ्या समाजकंटकांना आळा बसावा यासाठी निवेदन देण्यात आले.
युवारंग हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे व्यासपीठ आहे. भारतीय संविधानाने सर्वाना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. अशा ठिकाणी तरुणांना अभिव्यक्त केल्यापासून कोणी रोखू शकत नाही. कलाप्रकार सादर करणारा संघ बाद करणे हे चुकीचे आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केलेली दादागिरी निषेधार्ह आहे. त्याठिकाणी युवारंग आयोजकांनी धर्माच्या नावावर गोंधळ घालणाऱ्यांवर कठोर भूमिका घ्यायला हवी होती.
यावेळेस संघटनेचे राज्य अध्यक्ष अजय पाटील, जिल्हाध्यक्ष सुष्मिता भालेराव, वैशाली कोळी, मयूर साळवे, समाधान पाटील, जयेश सोळंके, मृणाली सुरळके उपस्थित होते.