जळगाव तालुक्यातील वसंतवाडी येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील वसंतवाडी येथे पोहण्यासाठी गेलेले रमेश भिका चव्हाण (४२) हे सोमवारी संध्याकाळी तलावाच्या पाण्यात बुडून बेपत्ता झाला आहेत. घटनास्थळी महसूल व पोलिस अधिकारी, कर्मचारी दाखल झाले असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पथक मृतदेह शोधण्यासाठी कामाला लागलेले आहेत. त्यांनी शोध सुरू केलेला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू आहे.
वसंतवाडी येथे भुलाबाई विसर्जनासाठी काही मुली गेलेल्या होत्या. त्या ठिकाणी रमेश चव्हाण हे तलावामध्ये हे पोहत होते. पोहताना अचानक थकल्यामुळे ते बुडाले आणी बेपत्ता झाले. या विषयी जिल्हा दूध संघाचे संचालक रमेश पाटील, नायब तहसीलदार दिलीप बारी व त्यांचे सहकारी तसेच म्हसावद पोलिस चौकीचे पोका हेमंत पाटील, प्रदीप पाटील हे घटनास्थळी पोहचले. इसमाचा शोध घेण्यात आला.
सोमवारी संध्याकाळी ते मिळून आले नव्हते. रात्री शोध थांबवण्यात आला. सकाळी त्यांचा मृतदेह शोधण्याचे काम आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कडून सुरू करण्यात आलेले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू आहे . मयत रमेश चव्हाण यांच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला आहे.
रमेश चव्हाण हे जैन व्हॅली कंपनीमध्ये मजुरी करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगी, दोन मुले असा परिवार आहे.