मुलांमध्ये जयेश पाटील तर मुलींमध्ये जान्हवी रोझोदे प्रथम
जळगाव (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय युवा दिन २०२४ चे औचित्य साधून जिल्हा एड्स नियंत्रण विभाग व ऍथलेटिक असोसिएशन, जळगाव यांचे संयुक्त विदयामाने दि.१९ जुलै रोजी सकाळी ७ वाजता सागर पार्क, जळगाव येथे मॅरेथॉन स्पर्धा १७ ते २५ वयोगातील महाविद्यालयीन विद्यार्थी – विद्यार्थीनी करिता आयोजित करण्यात आले होते. सदर स्पर्धेमध्ये ऑनलाईन प्रवेश विनामुल्य ठेवण्यात आला होता.
मॅरेथॅान स्पर्धेचा मार्ग सागर पार्क – काव्यरत्नावली चौक – महाबळ चौक – संभाजी नगर चौक – संत गाडगेबाबा चौक असा होता. स्पर्धेमध्ये विद्यार्थी – विद्यार्थीनी यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला. सकाळी स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांचे हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. स्पर्धेच्या सुरुवातीला प्रास्ताविक जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय पहुरकर यांनी केले. त्यानंतर प्रथम विद्यार्थी व विद्यार्थीनी गटाच्या मॅरेथॉन स्पर्धेस सुरवात करण्यात आली.
स्पर्धेमध्ये विजेत्या विद्यार्थी गटात प्रथम क्रमांक – जयेश विलास पाटील (एसपीटीएम महाविद्यालय, शिरपूर) , द्वितीय क्रमांक – मुकेश रमेश धनगर (मुलजी जेठा महाविद्यालय, जळगाव) , तृतीय क्रमांक – सुनील रामदास बारेला (मुलजी जेठा महाविद्यालय, जळगाव) यांनी यश मिळविले. विजेत्या विद्यार्थीनी गटात प्रथम क्रमांक – जानवी संजय रोझोदे (डॉ. सुनील महाजन कनिष्ट, महाविद्यालय, जळगाव , द्वितीय क्रमांक – अश्विनी सुनील मोरे (पी ओ नाहाटा महाविद्यालय, भुसावळ) तृतीय क्रमांक – सोनू अनिल चव्हाण (नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव) यांनी प्राविण्य मिळविले. ऑथलेटिक असोसिएशन, जळगाव यांचे उपस्थितीत जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय पहुरकर यांचे हस्ते पारितोषिक देण्यात आले.
स्पर्धा यशस्वी करणेसाठी जिल्हा सहा. कार्यक्रम – गिरीश गडे, समुपदेशक मनीषा वानखेडे, प्रशांत पाटील, दीपाली पाटील, विजय शिरसाठ, नामदेव पाटील, दिनकर तायडे, निशिगंधा बागुल, प्रयोगशाळा तंत्रज्ञ उज्वला पगारे, मिलन वाघोदेकर, सुवर्णा साळुंखे, शहर पोलीस प्रशासनातील संजय नाईक, शायद तडवी, नरेंद्र पाटील, राजेंद्र कुटे, विठ्ठल पाटील यांचेसह ऑथलेटिक असोसिएशन, जळगाव राजेश जाधव, इक्बाल मिर्झा व सहकारी, जिल्हा नियंत्रण विभागांतर्गत असलेले क्षेत्रीय कार्यकर्ता नितेश चव्हाण, राजेश्वर पाटील, नदीम पठाण यांनी परिश्रम घेतले.