यावल तालुक्यातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : यावल तालुक्यात असलेल्या साकळी गावात राहणाऱ्या एका विवाहित तरूणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. याबाबत यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मुकेश माधव गजरे (वय -४० वर्ष रा. साकळी ता. यावल) असे या विवाहित तरूणाचे नाव आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेशने पोटाच्या आजारास कंटाळुन १ जुलै सोमवार रोजी मध्यरात्री आपल्या राहत्या घरातील छताला साडीने गळफास घेत आत्महत्या केली. दरम्यान घटना उघडकीस आली असता मुकेशला रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याला मयत घोषित करण्यात आले. यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ सिकंदर तडवी हे करीत आहे.