भुसावळात दिवसाढवळ्या घरफोडी
भुसावळ (प्रतिनिधी):- शहरातील यशवंत कॉलनी परिसरात एका बंद घराचे कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लांबवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, परिसरात खळबळ उडाली आहे.

फिर्यादी शोभा सुधाकर जयकारे (वय ४५, रा. यशवंत कॉलनी, जामनेर रोड, नाहटा कॉलेज समोर) यांचे घर १६ एप्रिल रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेच्या दरम्यान बंद होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील लोखंडी कपाटाचे लॉकर उचकटून त्यातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १,१२,६५३ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
या घटनेबाबत २५ एप्रिल रोजी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले आणि बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय नेरकर करत आहेत. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.









