जळगाव ;- तालुक्यातील विटनेर येथील डॉक्टर दाम्पत्याला कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्या दोन मुलांसह १३ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
या डॉक्टरांचा तपासणी अहवाल खासगी लॅबकडून प्राप्त झाल्याने म्हसावद आरोग्य केंद्राच्या पथकाने त्यांच्या संपर्कातील दोन मुलांसह १३ जणांना क्वारंटाईन केले आहे. गावात तातडीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत . याठिकाणी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे.