चोपडा तालुक्यातील वडती बोरखेडा येथील अभिनव उपक्रम
चोपडा (प्रतिनिधी) : तालुक्याचे गटविकास अधिकारी आर. ओ वाघ यांनी संपूर्ण तालुक्यात एक लाख वृक्षारोपण व त्यांची जतन करण्याचा संकल्प घेतलेला असून त्यानिमित्ताने वडती-बोरखेडा ग्रामपंचायतीत एकाच वेळी अडीच हजार वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांचा मोठा उत्साह दिसून आला.
या वेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर, सहाय्यक गटविकास अधिकारी मोरे, विस्तार अधिकारी जे. पी. पाटील, गटशिक्षणाधिकारी अविनाश पाटील, केंद्रप्रमुख नरेंद्र सोनवणे, सरपंच देवानंद धनगर, उपसरपंच गजानन कोळी यांच्यासह निमगव्हाण गावासह विविध गावाचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, व्यापारी ग्रामस्थ शाळेतील विद्यार्थी माता पालक उपस्थित होते. ग. स.चे संचालक योगेश सनेर यांनी सभेस मार्गदर्शन करून वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचे विषद केले.
अध्यक्षीय मनोगतात वृक्षांवर घरातील व्यक्तीसारखे प्रेम करा वृक्ष लावा व वाढवा हेच आपले आजचे व उद्याचे भविष्य आहे. असे गटविकास अधिकारी आर.ओ. वाघ यांनी आपल्या भाषणात सांगितले. कारण झाडे जगली तरच पर्यावरण संतुलित राहणार आहे.